Join us

​प्रेक्षकांचा लाडका अभिजीत परततोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2016 13:52 IST

माझिया प्रियाला प्रीत कळेना या मालिकेमुळे अभिनेता अभिजीत खांडकेकर प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला होता. या मालिकेनंतर जवळजवळ तीन-चार वर्षं ...

माझिया प्रियाला प्रीत कळेना या मालिकेमुळे अभिनेता अभिजीत खांडकेकर प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला होता. या मालिकेनंतर जवळजवळ तीन-चार वर्षं तो छोट्या पडद्यापासून दूर राहिला. दरम्यान त्याने चित्रपटांमध्ये काम केले. पण अभिजीत पुन्हा एकदा मालिकेत झळकणार आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत अभिजीत प्रमुख भूमिकेत असल्याचे कळतेय. माझिया प्रियाला प्रीत कळेना या मालिकेत अभिजीत रोमेंटिक हिरो म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. पण आता या मालिकेत तो एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे. अभिजीतला त्याच्या या नव्या मालिकेबद्दल विचारले असता त्याने काहीही सांगण्यास नकार दिला. "मी कोणत्या मालिकेत काम करतोय की नाही हे प्रेक्षकांना काहीच दिवसांत कळेन. मी यावर काहीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही." अभिजीतने नकार दिला असला तरी या बातमीमुळे त्याचे फॅन्स नक्कीच खूश झाले असतील.