Join us

​अतुल परचुरे आता झळकणार या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2016 13:29 IST

अतुल परचुरेने यम है हम, आर के लक्ष्मण की दुनिया यांसारख्या मालिकेत प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. यम है हम ...

अतुल परचुरेने यम है हम, आर के लक्ष्मण की दुनिया यांसारख्या मालिकेत प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. यम है हम या मालिकेत त्याने साकारलेली चित्रगुप्त ही भूमिका तर प्रेक्षकांना खूप आवडली होती. या मालिकेतील त्याची आणि यमची भूमिका साकारलेला मानव गोहिल यांची केमिस्ट्री तर प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. आता अतुल परचुरे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे.  हर मुश्किल का हल अकबर बिरबल या मालिकेने जवळजवळ 500 भाग पूर्ण केले आहेत. ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेत आता अतुल परचुरेची एंट्री होणार आहे. तो या मालिकेत अकबरच्या चुलत भावाची भूमिका साकारणार आहे. त्याच्यासोबत या मालिकेत आनंद गोराडियाची एंट्री होणार आहे. आनंद अतुलचा मंत्री दाखवला जाणार आहे. या मालिकेत काम करण्यास अतुल खूप उत्सुक आहे. तो सांगतो, "माझ्या आतापर्यंतच्या सगळ्याच भूमिकांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे. यम है हम या मालिकेतील भूमिका तर त्यांनी डोक्यावर घेतली होता. आता या मालिकेत मी अकबरच्या चुलतभावाची भूमिका साकारणार आहे. त्याची मालिकेत का एंट्री झाली आहे हे मालिका पाहिल्यानंतरच लोकांना कळेल. या मालिकेचे सुरुवातीचे अनेक भाग मी पाहिले आहेत. त्यामुळे या मालिकेत काम करण्यास मी खूप उत्सुक आहे. किकू शारदा, विशाल कोटियन, डेलनाझ इराणी यांचे काम तर मला खूप आवडते. हे सगळेच माझे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. त्यांच्यासोबत काम करण्यास खूप मजा येणार आहे."