'मजाक मजाक में' मध्ये अतुल परचुरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2016 13:07 IST
लवकरच कॅामेडीचा मेळा छोट्या पडद्यावर भरणार आहे. विशेष म्हणजे यांत आता अतुर परचुरे आणि भारत गणेपुरे ही स्टँडअप कॅामेडी ...
'मजाक मजाक में' मध्ये अतुल परचुरे
लवकरच कॅामेडीचा मेळा छोट्या पडद्यावर भरणार आहे. विशेष म्हणजे यांत आता अतुर परचुरे आणि भारत गणेपुरे ही स्टँडअप कॅामेडी करतांना दिसणार आहेत. महाराष्ट्र टीकडून अतुल -भारत प्रतिनिधीत्त्व करतील. जवळपास पाच राज्याचे कलाकारांचा सहभाग असणा-या शो मध्ये शोएब अख्तर आणि हरभजन सिंग जजच्या भूमिकेत असणार आहेत. याआधीही अतुल परचुरेला आपण 'कॅामेडी नाईटस विथ कपिल' या शोमध्ये कॅामेडी करतांना पाहिलंय. त्यामुळे आता पुन्हा एकदा स्टँड-अप कॅामेडीच्या माध्यमातून अतुलची कॅामेडी फटकेबाजी ऐकायला मिळणार आहे.