Join us
Daily Top 2Weekly Top 5

अतुला दुग्गल ही अडकली विवाह बंधनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2016 18:43 IST

मराठी इंडस्ट्रीमध्ये सध्या सनई चौघडे वाजण्यास सुरूवात झाली आहे. एकापाठोपाठ एक विवाहबंधनात अडकताना दिसत आहे. चंदेरी दुनियातील विवाह म्हणजे ...

मराठी इंडस्ट्रीमध्ये सध्या सनई चौघडे वाजण्यास सुरूवात झाली आहे. एकापाठोपाठ एक विवाहबंधनात अडकताना दिसत आहे. चंदेरी दुनियातील विवाह म्हणजे प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते त्याविषयी जाणून घेण्यासाठी. मात्र यंदा मराठी चित्रपटसृष्ट्रीत सर्वाचे कर्तव्य असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण मागील काही दिवस सोशस मीडियादेखील लग्नमय झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच मराठी तारकांची उपस्थितीदेखील पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे काही लग्नात मराठी कलाकारांची धमाल पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे कलाकारांचे सेल्फीदेखील सोशल मिडीयावर आकर्षित करत असल्याचे दिसत आहे. आता हेच पाहा ना, कलाकार श्रुती मराठे- गौरव घाटणेकर, पल्लवी पाटील-संग्राम समेळ, चिराग पाटील-सना अंकोला आणि  मृण्मयी देशपांडे- स्वप्नील राव यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. त्याचबरोबर या कलाकारांचे मेहंदी आणि संगीत सोहळेदेखील चर्चेत असल्याचे दिसत आहे. मृण्मयी आणि स्वप्नीलचा डान्सदेखील चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. कारण फेसबुक त्यांच्या या फोटोला प्रचंड लाइक्स मिळताना दिसत आहे. आता या नवविवाहित जोड्यांच्या यादीमध्ये आणखी एका अभिनेत्रीच्या नावाचा समावेश होणार आहे. ती अभिनेत्री म्हणजे अतुला दुग्गल. अतुला ही क्रिएटिव्ह दिग्दर्शक सिध्दव नाचणे याच्यासोबत विवाहबंधनात अडकली आहे. अतुला आणि सिध्दवच्या फोटोला सोशल मीडियावर भरपूर लाइक्स मिळताना दिसत आहे. तसेच सोशल मीडियावर या जोडीला प्रचंड शुभेच्छादेखील मिळाल्या आहेत. त्यामुळे मराठी इंडस्ट्रीमध्ये वेडिंग का सीझन है असे म्हणण्यास हरकत नाही. अतुल ही स्टार प्रवाह वाहिनीवरील पुढचं पाऊल या मालिकेत पाहायला मिळाली. त्याचबरोबर ती झी मराठी वाहिनीवरील होणार सून मी हया घरची या मालिकेतदेखील झळकली होती.तर सिध्दवदेखील क्रिएटिव्ह दिग्दर्शक आहे. त्यामुळे एकाच क्षेत्रातील ही या कलाकारांची जोडी जमली.