Join us

​तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी दिली दिशा वकानीच्या कमबॅकवर प्रतिक्रिया...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2018 11:57 IST

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत दयाची भूमिका साकारणारी दिशी वकानी ही प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. दयाची बोलण्याची ...

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत दयाची भूमिका साकारणारी दिशी वकानी ही प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. दयाची बोलण्याची स्टाइल, कोणतेही कारण नसताना ती करत असलेला गरबा हे प्रेक्षकांना प्रचंड आवडते. त्यामुळे या मालिकेतील दया ही प्रेक्षकांची सगळ्यात आवडती आहे. पण गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांना या मालिकेत दयाबेनला पाहाता येत नाहीये. दयाने काहीच महिन्यांपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे आणि त्यामुळे ती तिचा सगळा वेळ हा तिच्या मुलीसोबतच घालवत आहे. दयाने गरोदर असताना देखील तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे चित्रीकरण केले होते. तिने सप्टेंबर महिन्यापर्यंत या मालिकेसाठी चित्रीकरण केले होते. ही मालिका तिच्यासाठी खूप खास असल्याने तिने हा निर्णय घेतला होता. आता ती मार्च महिन्यात पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात करणार असून मार्चनंतर प्रेक्षकांना तिला या मालिकेत पाहायला मिळणार असल्याची जोरदार चर्चा होती. पण सध्या तिला तिच्या बाळाकडे संपूर्ण लक्ष द्यायचे असल्याने तिने ही मालिका सोडली असल्याची बातमी गेल्या काही दिवसांपासून येत आहे. दिशा मालिका सोडणार हे कळल्यावर तिच्या फॅन्सना चांगलाच धक्का बसला होता. पण दिशाने मालिका सोडली नसल्याचे मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी सांगितले आहे. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे की, दिशीची मुलगी लहान असल्याने तिला सांभाळून चित्रीकरण करणे माझ्यासाठी सोपे नाहीये. दिशा पुन्हा चित्रीकरण करायला कधी सुरुवात करणार हे अजून काहीही ठरलेले नाही. तसेच ती तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सोडणार असल्याची अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा आमच्याकडून करण्यात आलेली नाहीये. दिशा गेल्या कित्येक महिन्यांपासून तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा भाग नसली तरी ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. ही मालिका नेहमीच टिआरपीच्या रेसमध्ये पहिल्या दहा कार्यक्रमांमध्ये असते. गेल्या काही आठवड्यांपूर्वी तर सगळ्या मालिका आणि रिअॅलिटी कार्यक्रमांना मागे टाकत सगळ्यात जास्त पाहिली जाणारी ही मालिका ठरली होती.Also Read : पहिल्यांदाच 'दया भाभी'च्या लेकीचा फोटो आला समोर,बघा फोटो