अश्विनी बनली भूत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2016 14:37 IST
कवच...काली शक्तियो से ही मालिका पहिल्याच आठवड्यात टिआरपीच्या रेसमध्ये अव्वल ठरली आहे. या मालिकेत आता प्रेक्षकांना एक नवी एंट्री ...
अश्विनी बनली भूत
कवच...काली शक्तियो से ही मालिका पहिल्याच आठवड्यात टिआरपीच्या रेसमध्ये अव्वल ठरली आहे. या मालिकेत आता प्रेक्षकांना एक नवी एंट्री पाहायला मिळणार आहे. अश्विनी काळसेकर या मालिकेत मंजुलिकाच्या आईच्या भूमिकेत झळकणार आहे. अश्विनी सौदामिनी ही व्यक्तिरेखा साकारणार असून एक भूत म्हणून ती प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सौदामिनी ही काळी जादू करणारी मांत्रिक होती आणि तिने तिच्या शक्तींचा वापर करून राजबिरच्या वडिलांना आपल्या जाळ्यात ओढले होते. तिला त्यांच्यावर मालकी स्थापित करायची होती. पण राजबिरच्या पत्नीला सौदामिनीच्या या वाईट प्रवृत्ताबद्दल कळल्यावर तिने याला कठोर सामना दिला होता. कालांतराने काही इच्छा अपूर्ण असतानाच सौदामिनीचा मृत्यू झाला होता. आता सौदामिनी भूत बनून तिच्या मुलीला तिचे प्रेम मिळवून देण्यासाठी मदत करणार आहे. अश्विनी या मालिकेत एक बंगाली व्यक्तिरेखा साकारत असल्याने प्रेक्षकांना तिचे एक वेगळे रूप या मालिकेत पाहायला मिळणार आहे.