Join us

आशु-शिवाची लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 13:42 IST

Shiva Serial : 'शिवा' मालिकेत नेहामुळे खूप घडामोडी घडताना दिसत आहेत. सीताईच्या दडपणाखाली आणि शिवाच्या आव्हानामुळे चिडलेल्या आशूने अखेर नेहाशी लग्न करणार असल्याची घोषणा केलीय.

'शिवा' (Shiva Serial) मालिकेत नेहामुळे खूप घडामोडी घडताना दिसत आहेत. सीताईच्या दडपणाखाली आणि शिवाच्या आव्हानामुळे चिडलेल्या आशूने अखेर नेहाशी लग्न करणार असल्याची घोषणा केलीय. नेहा शिवाला सांगते की, आशूने लग्नाला होकार दिला आहे. शिवा खूप आनंदित आहे तिला विश्वास असतो की, आशूच्या तिच्याविषयीच्या भावना वाढतील. 

शिवा सगळ्यांना सांगते की, आशूची चांगल्या प्रकारे काळजी घ्या. दिव्या, शिवा आणि नेहाला एकत्र बोलताना पाहते. नेहा आशूसमोर शिवाच्या हावभावांची नक्कल करते, ज्यामुळे आशूच्या मनात शिवाचा विचार अधिकच पक्का होतो. आशूच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे.  दरम्यान, शिवा आणि आशू एका आजारी महिलेला वाचवण्यासाठी एकत्र येतात. या घटनेमुळे आशूला शिवाच्या प्रामाणिकतेवर विश्वास बसतो. याआधी आशु आणि शिवा कंपनीच्या बोर्ड मीटिंगसाठी म्हणून एकत्र येतात, त्यात शिवाचा मुद्दा भाऊ उचलून धरतात पण आशुला हे पटत नाही.

आशु व शिवामध्ये होतं कडाक्याच भांडण

आशु व शिवामध्ये या कारणावरून कडाक्याच भांडण होते, नेहा त्यांच्यात पडून त्यांचे भांडण मिटवायच्या प्रयत्न करते. पण लॉबीमधे सगळे कामगार शिवाच्या बाजूने उभे आहेत. आशुची चिडचिड होते आणि ह्याचाच किर्ती व सीताई फायदा घेतात. नेहाला काही करून आशु व शिवाचे भांडण मिटवायचे आहे.  हे सर्व सुरु असताना पाना गँग, मांजा आणि संपदा मिळून शिवाला एक सरप्राईज द्यायचे ठरवतात. सगळे मिळून मकरसंक्रांतीचा सण आणि पतंगोत्सव जल्लोषात साजरा करायचा निर्णय घेतात. आता ही मकरसंक्रांत शिवा- आशु एकत्र साजरी करू शकतील? नेहा आणि आशूचं लग्न लावण्यात सीताई यशस्वी होईल का? हे पाहणे कमालीचे ठरेल.