आशिष घेतोय मेहनत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2016 13:46 IST
सिया के राम या मालिकेत सध्या प्रेक्षकांना युद्ध पाहायला मिळत आहे. या युद्धाच्या दृश्यांमध्ये कोणतीही कमतरता राहू नये यासाठी ...
आशिष घेतोय मेहनत
सिया के राम या मालिकेत सध्या प्रेक्षकांना युद्ध पाहायला मिळत आहे. या युद्धाच्या दृश्यांमध्ये कोणतीही कमतरता राहू नये यासाठी सध्या मालिकेची संपूर्ण टीमच प्रचंड मेहनत घेत आहे. युद्धात बाण आणि धनुष्य यांचा वापर करायचा असल्याने सध्या आशिषला शारीरिकदृष्ट्या फिट असणे आवश्यक आहे. त्यामुळे तो सध्या जिममध्ये अनेक तास घाम गाळत आहे. शारीरिकदृष्ट्या फिट असण्यासोबतच मानसिकहीदृष्ट्यादेखील फिट राहण्यासाठी सध्या तो चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी शक्तिमंत्राचा जप करत आहे. राम यांनी युद्धापूर्वी त्यांच्या शस्त्रांची पूजा केली होती. या पूजेमुळे त्यांना नक्कीच आत्मिक समाधान मिळाले असेल. मलादेखील मानसिक बळ मिळावे यासाठी मी मंत्राचा जप करत आहे असे आशिष सांगतो.