आशा भोसले यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2016 10:28 IST
भारतीयांचे प्रेक्षकांचे क्रिकेट वेड हे जगजाहीर आहेच. विराटच्या तुफानी फलंदाजीनंतर आज फायनलमध्ये इंडिया विरूद्ध वेस्ट इंडिज सामना मुंबईमध्ये पाहायला ...
आशा भोसले यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा
भारतीयांचे प्रेक्षकांचे क्रिकेट वेड हे जगजाहीर आहेच. विराटच्या तुफानी फलंदाजीनंतर आज फायनलमध्ये इंडिया विरूद्ध वेस्ट इंडिज सामना मुंबईमध्ये पाहायला मिळणार आहे. करोडो भारतीय आज विजयासाठी देवाकडे प्रार्थना करीत असेल हे नक्की. पण त्याचबरोबर भारतातील दिग्गज व्यक्तीमहत्वांनी देखील आजच्या सामन्यासाठी भारतीय टीमला फेसबुक, ट्विीटर, इन्स्टा अशा विविध सोशलवेबसाइडच्या माध्यमातून भारतीय टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये आपल्या मधुर आवाजाने रसिकांच्या मनावर आधिराज्य करणारी प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी देखील ट्विीटर वर युवराज सिंग सोबतचा फोटो शेअर करीत भारतीय टीमला विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आमच्या करोडो लोकांच्या शुभेच्छा आणि पाठिंबा १०० टक्के करणाºया तुमच्यासोबत आहे असे स्टेटस देखील त्यांनी अपडेट केले आहे.तसेच लोकमत सीएनएक्सच्यावतीने देखील फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारतीय टीमला खूप खूप शुभेच्छा.