Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुपर डान्सर कार्यक्रमात आशा पारेख यांनी कबूल केली ही गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 09:41 IST

सुपर डान्सरच्या आगामी भागात वहिदा रेहमान आणि आशा पारेख प्रेक्षकांना भूतकाळात घेऊन जाणार आहेत. त्यावेळेच्या बॉलिवूड इंडस्ट्रीविषयी अनेक गोष्टी त्यांना सांगणार आहेत.

ठळक मुद्देभन्सालींचे चित्रपट भव्य असतात आणि ते पाहताना नेत्रसुख मिळते. पद्मावत, बाजीराव मस्तानी सारखे भन्सालींचे चित्रपट मला खूप आवडतात. ते भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवतात आणि ते वास्तविकतेला धरून असतात.

सोनी एण्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध शो सुपर डान्सर मध्ये सगळेच स्पर्धक एकाहून एक दमदार परफॉर्मन्स सादर करत आहेत. शिल्पा शेट्टी, गीता कपूर आणि अनुराग बासू या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका बजावत असून दर आठवड्याला बॉलिवूडमधील सेलिब्रेटी या कार्यक्रमात हजेरी लावतात. आता बॉलिवूडमधील दोन ज्येष्ठ अभिनेत्री या कार्यक्रमात उपस्थित राहाणार आहेत.

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान आणि आशा पारेखसुपर डान्सरमध्ये येऊन चिमुकल्यांच्या नृत्याचे कौतुक करणार आहेत. त्याचसोबत त्यांच्या काळातील अनेक आठवणी लहान मुलांसोबत शेअर करणार आहेत. सुपर डान्सर या कार्यक्रमाचा हा विशेष भाग प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी या कार्यक्रमाच्या टीमला खात्री आहे. या कार्यक्रमातील सगळेच स्पर्धक एकाहून एक सरस नृत्य सादर करत असून त्यांचे परफॉर्मन्स पाहून वहिदा रेहमान आणि आशा पारेख या दोन्ही अभिनेत्री प्रचंड खूश होणार आहेत.

सुपर डान्सरच्या आगामी भागात वहिदा रेहमान आणि आशा पारेख प्रेक्षकांना भूतकाळात घेऊन जाणार आहेत. त्यावेळेच्या बॉलिवूड इंडस्ट्रीविषयी अनेक गोष्टी त्यांना सांगणार आहेत. एवढेच नव्हे तर त्यांचा बॉलिवूडमधील प्रवास कसा सुरू झाला याबद्दल देखील गप्पा मारणार आहेत. 

या विशेष भागात स्पर्धक आणि त्यांचे गुरू वहिदा रेहमान आणि आशा पारेख यांच्या गाण्यांवर दमदार परफॉर्मन्स सादर करणार आहेत. या दोन्ही अभिनेत्रींनी या स्पर्धकांचे परफॉर्मन्स प्रचंड आवडले असून हे परफॉर्मन्स पाहिल्यानंतर आशा पारेख यांनी कबुली दिली की, त्यांना संजय लीला भन्सालीचे सर्वच चित्रपट खूप आवडतात आणि त्या त्यांच्या पुढच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात असतात. त्या पुढे म्हणाल्या की, भन्सालींचे चित्रपट भव्य असतात आणि ते पाहताना नेत्रसुख मिळते. पद्मावत, बाजीराव मस्तानी सारखे भन्सालींचे चित्रपट मला खूप आवडतात. ते भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवतात आणि ते वास्तविकतेला धरून असतात.

आशा पारेख यांना स्पर्धकांचे सगळेच परफॉर्मन्स आवडले आणि त्यातील काही खूपच भव्य आणि मोहक असल्याचे त्यांनी सांगितले.

सुपर डान्सर मध्ये त्यांनी हे देखील सांगितले की, शम्मी कपूर आणि शशी कपूर हे त्यांच्या काळातील सर्वात चांगले नर्तक होते. तसेच रणबीर, करिना, करिश्मा कपूर या कपूर कुटुंबातील सर्वांच्याच शरीरामध्ये संगीत आणि लय भिनलेली आहे.

टॅग्स :आशा पारेखसंजय लीला भन्साळीशिल्पा शेट्टीसुपर डान्सर