Join us
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा Delete च करायचा होता मग अपलोड तरी का केला? अभिनेत्रीच्या फोटोने सोशल मीडियावर धुमाकुळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2020 10:22 IST

आशा नेगी सध्या तरी आपल्या व्हेकेशन मोडचा आनंद घेत आहे आणि नुकतंच तिनं आपल्या इन्स्टाग्राम पेजवर नवा फोटो शेअर केला आहे.

ब-याचदा काही सेलिब्रेटी हॉट आणि बोल्ड फोटोशूट करत रसिकांचे लक्ष वेधून घेतात. असेत फोटोशूट करत एका अभिनेत्रीने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. अभिनेत्री आशा नेगी सध्या व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. निवांत क्षणाचा आनंद लुटत आहे. तिचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे तर काहीजण संमिश्र प्रतिक्रीया देत आहेत. आशा नेगीचे हे टॉपलेस फोटो आहेत. खरंतर अशा प्रकारचे फोटोशूट करणे सेलिब्रेटींसाठी काही नवीन नाही. पण आशा नेगीने अशा प्रकारचे  फोटोशूट करणं तिच्या चाहत्यांना मात्र  रुचलं नाही. 

टीव्ही मालिका ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेने सर्वांची मने जिंकली होती. या मालिकेतील अंकिता लोखंडे व सुशांत सिंग राजपूत ही जोडी प्रचंड लोकप्रिय झाली होती. सोबतच रित्विक व आशा यांची जोडीही गाजली होती. ‘पवित्र रिश्ता’च्या सेटवरच रित्विक व आशा एकमेकांच्या प्रेमात पडले होते. तेव्हापासून हे कपल एकमेकांसोबत होते. आशा ही रित्विकच्या कुटुंबाच्याही अतिशय क्लोज आहे. दोघेही टीव्ही इंडस्ट्रीचे लोकप्रिय कपल मानले जात होते.

2019 मध्ये म्हणजे मागच्या वर्षी हे कपल लग्न करणार असल्याची चर्चा होती. अर्थात त्यावेळी दोघांनीही याचा इन्कार केला होता. आम्ही दोघेही एकमेकांसोबत आनंदी आहोत. पण अद्याप आमचा लग्नाचा विचार नाही, असे रित्विकने स्पष्ट केले होते.

आशा नेगी आणि ऋत्विक धनजानी त्यांच्या अफेअरमुळे चर्चेत होते.  दोघे एकमेकांना गेल्या 6 वर्षापासून डेट करत होते. मात्र काही कारणामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि याचवर्षी  ब्रेकअपही झाले. इतरांसाठी क्युट कपल ठरलेले आशा आणि ऋत्विकच्या ब्रेकअपची बातमीने त्यांच्या चाहत्यांसाठी मात्र  धक्कादायक होते. 

पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत आशा म्हणाली होती, "लोक वेगळे होतात, नाती फुटतात." परंतु सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मनात त्या व्यक्तीसाठी प्रेमाची भावना सतत ठेवा. मला माझ्या वैयक्तिक आयुष्याविषयी अधिक बोलायचे नाही. जे होते ते चांगल्यासाठी होते. दोघांची मार्ग वेगवेगळे झाले असले तरीही आम्ही चांगले मित्र आहोत. त्यामुळे दोघेही आपले आयुष्य एन्जॉय करत आहेत.