Join us
Daily Top 2Weekly Top 5

'दिल है हिंदुस्तानी २'च्या मंचावर आशा भोसलेंचा वेगळा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 12:29 IST

स्टार प्लसवरील 'दिल है हिंदुस्तानी-२' या कार्यक्रमाचा आनंद घेत असलेल्या दिग्गज पार्श्वगायिका आशा भोसले यांचीएक वेगळीच बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळाली.

ठळक मुद्देआशा भोसलेंनी गायले रॅप साँगबादशहा गाणार आशा भोसलेंसोबत रॅप साँग

स्टार प्लसवरील 'दिल है हिंदुस्तानी-२' या कार्यक्रमाचा आनंद घेत असलेल्या दिग्गज पार्श्वगायिका आशा भोसले यांची एक वेगळीच बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळाली. त्यांचे हे रूप बहुतेकांसाठी नवे असेल. यावेळी त्यांनी आजच्या तरूण पिढीला आवडणाऱ्या रॅपचा बादशहा याच्याबरोबर एक रॅप गीत गाण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासारख्या एका ज्येष्ठ गायिकेला रॅपसारखे उडत्या चालीचे गीत गाताना पाहून सर्वजण थक्क झाले.

आशाताईंनी यावेळी प्रथमच बादशहाला रॅप गीत गाताना पाहिले होते आणि त्याच्या या कौशल्यामुळे त्या मोहित झाल्या आणि त्यांनाही रॅप गीत गाण्याची स्फूर्ती आली. त्यांचे रॅप गीत गायन पाहून आपल्या आगामी अल्बममध्ये आशाताईंनी आपल्याबरोबर रॅप गीत गावे अशी यावेळी बादशहाने केलेली विनंती त्यांनी मान्य केल्याचे सूत्रांनी सांगितले.आशाताईंना रॅप गीत गाताना पाहून आनंदित झालेल्या बादशहाने सांगितले, 'आशाताईंसारख्या थोर आणि दिग्गज गायिकेला भेटल्यावर मला विलक्षण आनंद झाला. त्यांच्यासारख्या गायिका या साऱ्या देशासाठी एक प्रेरणा आहेत. त्यांना माझे रॅप गायन आवडल्याचे सांगितल्यावर मला फारच आनंद झाला. त्यांच्यासारख्या महान गायिकेबरोबर रॅप गीत गाणे हा मन प्रसन्न करणारा अनुभव होता. मी लवकरच त्यांच्याबरोबर रॅप गीत गाणार आहे.''दिल है हिंदुस्तानी-२' हा भारतीय संगीताच्या प्रेमामुळे देशांच्या सरहद्दी पुसून टाकणारा आणि हिंदुस्तानी संगीतावर प्रेम करणाऱ्या जगभरातील संगीतप्रेमींना एकत्र आणणारा रिअ‍ॅलिटी कार्यक्रम आहे. भारतीय संगीताचा प्रभाव अधोरेखित करणारा आणि जगभरातील स्पर्धकांकडून लोकप्रिय भारतीय संगीताला नवा आयाम देणाऱ्या कार्यक्रमात जगभरातील हिंदुस्तानींचे एक संमेलनच भरलेले असते. या कार्यक्रमात जगभरातील गुणी गायक आणि संगीतकार लोकप्रिय भारतीय गाणी गातील. पण ती गाणी ते स्वत:च्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत गातात.

टॅग्स :आशा भोसले