Join us

आशा भोसले सारेगमपमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 18:11 IST

सारेगमप या कार्यक्रमाच्या सेटवर येऊन अनेक कलाकार, गायक स्पर्धकांना नेहमीच प्रोत्साहन देत असतात. नुकतीच वर्ल्ड म्युझिक डेच्या निमित्ताने ज्येष्ठ ...

सारेगमप या कार्यक्रमाच्या सेटवर येऊन अनेक कलाकार, गायक स्पर्धकांना नेहमीच प्रोत्साहन देत असतात. नुकतीच वर्ल्ड म्युझिक डेच्या निमित्ताने ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी कार्यक्रमात उपस्थिती लावली. स्पर्धकांची गाणी ऐकल्यावर मला देखील त्या काळातच हरवून गेल्यासारखे वाटत असल्याचे त्या म्हणाल्या. स्पर्धकांची गाणी ऐकल्यानंतर आशा भोसले यांनी त्यांची मोठी बहीण लता मंगेशकर यांना लगेचच फोन केला आणि स्पर्धकांना त्यांच्यासोबत बोलण्याची संधी दिली. लता दिदींनी स्पर्धकांचे कौतुक तर केले. पण त्याचसोबत त्यांना अमूल्य टिप्सही दिल्या. या कार्यक्रमातून काही कारणास्तव तुम्ही बाहेर पडलात तरी निराश होऊ नका. कारण ही केवळ एक स्पर्धा आहे हे लक्षात ठेवा असे त्यांनी स्पर्धकांना सांगितले.