Join us
Daily Top 2Weekly Top 5

​आसावरी जोशी दिसणार शंकर जयकिशन थ्री इन वन मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2017 13:05 IST

आसावरी जोशीने मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. ऑफिस ऑफिस या मालिकेतील आसावरी जोशीची भूमिका तर ...

आसावरी जोशीने मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. ऑफिस ऑफिस या मालिकेतील आसावरी जोशीची भूमिका तर प्रचंड गाजली होती. आता आसावरी शंकर जयकिशन थ्री इन वन या मालिकेत झळकणार आहे. शंकर जयकिशन थ्री इन वन या मालिकेत आसावरी शंकर, जय आणि किशन म्हणजेच केतन सिंगच्या आईची भूमिका साकारणार आहे. ती या मालिकेत अतिशय प्रेमळ आईची भूमिका साकारणार असून या मालिकेत ती पंजाबी स्त्रीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. तिची भूमिका एक ड्रामा क्वीन पण मनाने अत्यंत हळव्या असलेल्या स्त्रीची आहे. ती अतिशय हुशार असून प्रत्येक गोष्टींचा विचार अतिशय योग्यरितीने करते. पण काही वेळा ती अतिशय कटू देखील बोलते. एका अपघातामुळे तिला अपंगत्व आले आहे. या भूमिकेविषयी बोलताना आसावरी सांगते, मी पूर्वी सब या वाहिनीसोबत ऑफिस ऑफिस या मालिकेत काम केले होते. आता पुन्हा अनेक वर्षांनी या वाहिनीसोबत काम करताना मला प्रचंड आनंद होत आहे. सावित्री ही भूमिका अतिशय चांगली आहे. मला जय, शंकर आणि किशन अशी तीन मुले असल्याचे मालिकेत दाखवण्यात आले आहे. प्रत्येक महिलेला ही भूमिका आपलीशी वाटेल अशी मला खात्री आहे.शंकर जयकिशन थ्री इन वन या मालिकेत केतन सिंग किशन ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. एका अपघातात शंकर, जय आणि किशन या तिळ्या मुलांपैकी किशन एकटाच वाचतो. त्याची आई ही विधवा असून ती अपंग आहे. तसेच तिचे हृदय अतिशय कमजोर आहे. त्याच्या आईला हार्ट अॅटॅक देखील येऊन गेला आहे. त्यामुळे तिच्या तीन मुलांपैकी दोन मुलांचे निधन झाले आहे ही गोष्ट ती सहन करू शकत नाही याची चांगलीच कल्पना किशनला आहे. त्यामुळे किशन आपल्या दोन भावांचा मृत्यू झाला आहे ही गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवण्याचे ठरवतो आणि आईसमोर जय आणि शंकर या भूमिकेतही वावरतो. Also Read : शंकर जयकिशन थ्री इन वन या मालिकेत केतन सिंग साकारणार तीन भूमिका