Join us

ह्या मालिकेसाठी दररोज दोन तास प्रवास करायला तयार झाल्या अरूणा इराणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 07:15 IST

स्टार प्लस वाहिनीवर दिल तो हॅपी है जी ही नवी मालिका नुकतीच दाखल झाली आहे.

ठळक मुद्दे'दिल तो हॅपी है जी' मालिका आली प्रेक्षकांच्या भेटीला

स्टार प्लस वाहिनीवर दिल तो हॅपी है जी ही नवी मालिका नुकतीच दाखल झाली आहे. या मालिकेत दादीची भूमिका अरूणा इराणी साकारत आहेत. या मालिकेच्या सेटवर पोहचण्यासाठी दररोज दोन तास प्रवास करावा लागतो. पण, त्यांना चित्रपटाच्या सेटवर पोहचण्यासाठी दोन तास प्रवास करावा लागतो पणत्यांना ते आवडते.

अरूणाजी सिनेइंडस्ट्रीमध्ये सुमारे ६ दशके काम करत असल्या तरी आजही मनाने त्या तरूण आहेत आणि त्यांना आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत काम करत राहायचे आहे. ह्या मालिकेत त्या खडूस दादीची भूमिका करत असून त्याबद्दल त्या अतिशय उत्साहात आहेत. आपल्या प्रवासाला लागणाऱ्या वेळाबद्दल त्याम्हणतात, “सुरूवातीला मी अनेक ऑफर्स नाकारल्या कारण मला खूप प्रवास करावा लागणार होता पण नंतर मात्र मला त्याचे वाईट वाटले. पण ‘दिल तो हॅपी है जी’ मला एवढी आवडली की त्यासाठी प्रवास करायलाही तयार आहे. मी माझे मन पक्के केले आहे कारण बहुतेक सेट शहरापासून लांबच आहेत आणि जरमला काम करत राहायचे असेल तर मला प्रवास हा करायलाच हवा.”'दिल तो हॅपी है जी' मालिकेची निर्मिती इश्कबाज व कुल्फी कुमार बाजेवालाचे निर्माते गुल खान करत आहेत. ‘दिल तो हॅपी है जी’ दर सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्लसवर पाहता येईल. 

टॅग्स :अरुणा इराणीस्टार प्लस