Join us
Daily Top 2Weekly Top 5

​या कलाकाराला मिळाला मालिकेतून डच्चू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2016 18:19 IST

नामकरण या मालिकेत बरखा बिष्ट, विराफ फिरोज पटेल आणि आर्शीन हे तिघेही प्रमुख भूमिका साकारत आहेत. या मालिकेची कथा ...

नामकरण या मालिकेत बरखा बिष्ट, विराफ फिरोज पटेल आणि आर्शीन हे तिघेही प्रमुख भूमिका साकारत आहेत. या मालिकेची कथा ही बरखा आणि आर्शीन यांच्याभोवती फिरते. ही मालिका स्त्रीप्रधान असल्याने या मालिकेत पुरुष व्यक्तिरेखेला तितकेसे महत्त्व दिले जात नाही. पण असे असूनदेखील विराफने या मालिकेत काम करण्याचे ठरवले होते. आपल्यापरिने ही भूमिका अधिकाधिक चांगली व्हावी यासाठी तो नेहमीच प्रयत्न करत असतो. पण आता त्याला या मालिकेतून डच्चू देण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. विराफ खूप चांगला अभिनय करत असला तरी त्याची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना रुचत नाहीये असे दिसून येत आहे. विराफ साकारत असलेला आशिष हा मालिकेचा नायक आहे. पण मालिकेच्या कथानकाच्या मागणीनुसार आणि प्रेक्षकांची रुची वाढवण्यासाठी एक ट्विस्ट देण्यात येणार आहे. त्यानुसार आशिषची व्यक्तिरेखा प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे काही दिवसांनंतर प्रेक्षकांना विराफला या मालिकेत पाहाता येणार नाही. आशिषच्या ऐवजी एक नवी व्यक्तिरेखा मालिकेत येणार आहे. विराफला अचानक घेतल्या गेलेल्या या निर्णयामुळे खरे तर चांगलाच धक्का बसला आहे. पण मालिकेच्या टीमने घेतलेल्या या निर्णयामुळे तो दुखावलेला नाहीये असेही म्हटले जात आहे. विराफ इतकाच ताकदीचा अभिनेता शोधणे हे आता मालिकेच्या टीमसाठी आव्हानात्मकच बनले आहे.नामकरण या मालिकेची कथा ही प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते महेश भट्ट यांची आहे. त्यांनी जख्म, सडक यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे.