अर्शी खानचा तो व्हिडीओ व्हायरल, अश्लील चाळे करताना कैद झाली कॅमे-यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 16:38 IST
बिग बॉसमध्ये अर्शी खान नावाच्या वादळामुळे अक्षरशः घरातल्यांची झोप उडाली आहे. त्याला कारणही तसेच आहे. अर्शी खान स्पर्धकाच्या अगदी ...
अर्शी खानचा तो व्हिडीओ व्हायरल, अश्लील चाळे करताना कैद झाली कॅमे-यात
बिग बॉसमध्ये अर्शी खान नावाच्या वादळामुळे अक्षरशः घरातल्यांची झोप उडाली आहे. त्याला कारणही तसेच आहे. अर्शी खान स्पर्धकाच्या अगदी जवळ जात नको ते चाळे करत असल्यामुळे स्पर्धकही हैराण झाले आहे. त्यामुळे अर्शी खानची घरातून कधी एक्झिट होणार याचीच घरातले स्पर्धक वाट पाहात असतात. त्यामुळे पहिल्या आठवड्यापासून पाचव्या आठवड्यापर्यंत सलग आर्शिला घरातल्या स्पर्धकांनी नॉमिनेट केले आहे.अर्शी खानही घरात करणा-या खोड्यांमुळेच टिकून आहे. ती लवकर घराबाहेर पडणार अशी कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाही. ददलानी खानदानचा चिराग म्हणून ओळखला जाणार आकाश ददलानी हा स्पर्धक अर्शी खानसह गप्पा मारताना आर्शी त्याच्या अगदी जवळ गेली आणि त्याच्या पँटमध्ये हात टाकत अश्लिल चाळे करत असल्याचे कॅमे-यात कैद झाले. 'बिग बॉस'चा एक अनसीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अर्शी खानचे सगळे कारनामे यात स्पष्ट दिसतायेत. आकाशही तिला टाळण्याचा प्रयत्न करताना दिसतोय.मात्र कोणाच ऐकणार ती अर्शी खान कसली. यामुळेच आता ती दिसताच सगळे तिच्यापासून लांब पळतातत. घरात एंट्री करताच तिने हितेन तेजवानीवर निशाणा साधला होता.मात्र हितेनने वेळीच सावरत तिच्यापासून लांब राहाणेच पसंत केले. यावर ब-याच चर्चाही झाल्या मात्र अर्शी खानबद्दल ब-याच गोष्टी हितेनला कळताच त्याने तिला लांबच ठेवले. इतकेच नाही तर तिला तसा हितनने दमच दिला होता. त्यामुळे आता हितने हातातून गेला म्हटल्यावर आकाश ददलानीवर तिने निशाणा साधल्याचे पाहायला मिळत आहे.अर्शी खानने शाहिद आफ्रिदीच्या गर्लफ्रेड असल्याचे सांगत खूप प्रसिद्धी मिळवली होती.मात्र विकेंड का वॉर या भागात स्पर्धकांना त्यांच्या आयुष्यातले एक खास गुपित सांगायचे होते.त्या टास्कनुसार अर्शी खानने शाहिद आफ्रिदीसह केलेली एक थट्टा होती असेही तिने सांगितले.त्यामुळे पब्लिसिटी के लिये कुछ भी करणारी अर्शी आगामी काळात बिग बॉसच्या घरात आणखी काय धुमाकुळ घालणार या कडेच सा-यांचे लक्ष लागले आहे.