Join us

​अर्जुन बिजलानी झळकणार नागिन2मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2017 14:14 IST

नागिन या मालिकेचा पहिला भाग प्रचंड गाजला होता. या मालिकेची कथा प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेची कथा ही ...

नागिन या मालिकेचा पहिला भाग प्रचंड गाजला होता. या मालिकेची कथा प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेची कथा ही सुपरनॅचरल पॉवरवर आधारित होती. या मालिकेच्या कथेप्रमाणे या मालिकेतील कलाकारदेखील प्रेक्षकांना प्रचंड भावले होते. या मालिकेतील मॉनी रॉय आणि अर्जुन बिजलानी यांच्या केमिस्ट्रीची तर त्यावेळी चांगलीच चर्चा झाली होती. या कार्यक्रमाच्या यशानंतर नागिन 2 प्रेक्षकांच्या भेटीस आले. या कार्यक्रमातदेखील मॉनी रॉय प्रमुख भूमिकेत झळकत आहे. पण या मालिकेत अर्जुन काम करत नाहीये. पण अर्जुनच्या फॅन्ससाठी एक चांगली बातमी आहे. तो लवकरच या मालिकेत झळकणार असल्याचे म्हटले जात आहे.नागिन या मालिकेच्या कथानकाला सध्या चांगलेच वळण मिळाले आहे. शिवानी म्हणजेच मॉनी रॉय सध्या तिच्या पालकांचा खून कोणी केला याचा शोध घेत आहे. या सगळ्या गोष्टीमुळे प्रेक्षकांना कथानकात पुढे काय होईल याची चांगलीच उत्सुकता लागली आहे. अर्जुन बिजलानी सध्या परदेस में है मेरा दिल या मालिकेत काम करत असून या मालिकेत तो प्रमुख भूमिकेत झळकत आहे. त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक होत आहे. अर्जुनने नागिन या मालिकेच्या पहिल्या सिझनमध्ये रित्विक ही भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. आता तो प्रेक्षकांना दुसऱ्या सिझनमध्येदेखील पाहायला मिळणार आहे. नागिनच्या दुसऱ्या सिझनमध्ये काही फ्लॅशबॅकमधल्या घटना प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून यात अर्जुन दिसणार आहे. अर्जुनने या मालिकेसाठी चित्रीकरण सुरू केले असून तो लवकरच प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळणार असल्याचे कळतेय.