Join us
Daily Top 2Weekly Top 5

​अर्जुन बनला नागार्जुन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2016 17:21 IST

नागार्जुन-एक योद्धा या मालिकेत अर्जुन या साध्या मुलाचे नागार्जुनमध्ये झालेले रूपांतर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मोठ्या पडद्यावर अनेक चित्रपटांमध्ये ...

नागार्जुन-एक योद्धा या मालिकेत अर्जुन या साध्या मुलाचे नागार्जुनमध्ये झालेले रूपांतर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मोठ्या पडद्यावर अनेक चित्रपटांमध्ये आपल्याला सुपरहिरो पाहायला मिळालेत. आपल्याला पहिल्यांदाच एका मालिकेत सुपरहिरो पाहायला मिळणार आहे. नागांचा राजा तक्षक अर्जुनचा आत्मा काढून त्याचे रूपांतर नागार्जुन या राक्षसात करणार आहे त्यामुळे प्रेक्षकांना अर्जुनचे एक विक्राळ रूप पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील हाणामारींच्या दृश्यांसाठी अंशुमन मल्होत्रा सध्या विशेष प्रशिक्षण घेत आहे. तो मृणाल जैन आणि निकितन धीर यांच्यासोबत दोन हात करणार आहे.