अरिजित सिंहने गायले या मालिकेचे शीर्षक गीत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 14:35 IST
विविध मालिकांमधून वेगवेगळ्या गायकांनी मालिकांचे शीर्षक गीत गात घराघरात एंट्री केली आहे.टायटल ट्रॅक जितकं सुरेख तितकी मालिका हिट हे ...
अरिजित सिंहने गायले या मालिकेचे शीर्षक गीत!
विविध मालिकांमधून वेगवेगळ्या गायकांनी मालिकांचे शीर्षक गीत गात घराघरात एंट्री केली आहे.टायटल ट्रॅक जितकं सुरेख तितकी मालिका हिट हे समीकरण आता बनले आहे.त्यामुळेच सध्या मालिकांच्या कथानकाप्रमाणेच टायटल ट्रॅकवरही जास्त मेहनत घेतली जात असल्याचे पाहायला मिळतं.आता अरिजित सिंहच्या आवाजातील शीर्षक गीत घराघरात ऐकयला मिळणार आहे.‘स्टार प्लस’वरील ‘कृष्णा चली लंडन’ ही आगामी मालिका एका 21 वर्षांच्या राधे या कानपूरमध्ये राहणा-या देखण्या तरूणाची कथा असून त्याचे एकच स्वप्न असते, ते म्हणजे लग्न करणे.या मालिकेसाठी कलाकारच नव्हे, तर पार्श्वगायक, संगीतकार वगैरे सर्व सुविधांसाठी या क्षेत्रातील दर्जेदार कलाकारांना करारबध्द करण्यावर निर्मात्यांचा कटाक्ष आहे. आता या मालिकेचे शीर्षकगीत गाण्यासाठी निर्मात्यांनी नामवंत संगीतकार व गायक अरिजित सिंह याची निवड केल्याचे आमच्या कानावर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “बॉलिवूडमधील रोमँटिक गीतांसाठी प्रसिध्द असल्यामुळे या मालिकेच्या शीर्षकगीतासाठी अरिजित सिंह याची निवड अगदी योग्य ठरते.या शीर्षकगीताच्या रचनेबद्दल सारी टीम खूपच उत्साही बनली असून या गीताच्या ध्वनिमुद्रणाची तयारी जोरात सुरू आहे.ते लवकरच प्रस्तुत केले जाईल.” या मालिकेची संकल्पना अगदी नवीन असून तिच्या कथेद्वारे प्रेक्षकांना एक सूचक संदेशही दिला जाणार आहे.cnxoldfiles/a>तो स्वत: नववी इयत्ता नापास असला आणि त्याच्या जीवनात कोणतेही ध्येय व आकांक्षा नसल्या, तरी आपल्या पत्नीला आनंदी ठेवण्यासाठी तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याची त्याचा निर्धार असतो.त्याच्या कुटुंबात तो सर्वात लहान असल्याने सर्वांचा लाडका असतो.पण कौटुंबिक निर्णय प्रक्रियेत त्याला काही स्थान नसते. पण त्याचा निरागस आणि आकर्षक स्वभाव सर्वांचे मन जिंकून घेत असे.त्याला नृत्य करायला फार आवडतं.1990 च्या दशकातील गाण्यांचा तो चाहता असतो.आपल्याला जीवनात सर्व काही मिळाले आहे,अशी त्याची भावना असते- उत्तम कुटुंबीय, उत्तम मित्र, सुखाचे जीवन आणि आता त्याला त्याची पत्नी मिळाली की त्याचे जीवन परिपूर्ण होईल, अशी त्याची समजूत असते.'कृष्णा चली लंडन' या मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. या प्रोमोमध्ये राधे आपली स्वत:ची माहिती देत असून त्याचा मित्र साजन ती मोबाईलवर रेकॉर्ड करत असल्याचे दिसून येत आहे. यावेळी राधेची ओळख जाणून घेण्यासाठी त्याला काही प्रश्न विचारले जात आहेत.यात त्याचे ‘नाव’, ‘काम’, ‘आपल्या पायावर उभा आहे की नाही?’ यासारख्या प्रश्नांची उत्तरे तो आपल्याला देताना दिसत आहे. या प्रोमोच्या अखेरीस राधे आपली ही ओळख करून देणारा व्हिडिओ अनेक मुलींना पाठवतो आणि त्यासोबत एक प्रश्नही विचारतो, “है कोई नजर में?” कृष्णा चली लंडन या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस येऊन काहीच दिवस झाले असले तरी या प्रोमोला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.