Join us

​अरहान खानची छोट्या पडद्यावर एंट्री !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2016 16:22 IST

जाहिरात आणि फॅशनच्या दुनियेतील एक प्रसिद्ध नाव असलेला अरहान खान लवकरच छोट्या पडद्यावर एंट्री मारतोय. 'बढो बहू' या मालिकेतून ...

जाहिरात आणि फॅशनच्या दुनियेतील एक प्रसिद्ध नाव असलेला अरहान खान लवकरच छोट्या पडद्यावर एंट्री मारतोय. 'बढो बहू' या मालिकेतून तो आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. या मालिकेत अरहान प्रिंस नरुला याचा भाऊ राणा सिंह अहलावतच्या भूमिकेत दिसणार आहे. ही मालिका रेसलिंगवर आधारित असल्यानं त्याची कथा भावल्याचं अरहाननं म्हटलंय. या मालिकेत खलनायकाच्या भूमिकेत झळकणार असून रसिकांना ही भूमिका आवडेल असा विश्वास त्यानं व्यक्त केलाय.