Join us
Daily Top 2Weekly Top 5

​आर्चीचा दुर्गावतार !!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2016 17:22 IST

‘सैराट’ चित्रपटामुळे संपूर्ण चाहत्यांना याड लावणाऱ्या आर्चीचा एक नवा अवतार आपणास पाहावयास मिळणार आहे.  'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात ...

‘सैराट’ चित्रपटामुळे संपूर्ण चाहत्यांना याड लावणाऱ्या आर्चीचा एक नवा अवतार आपणास पाहावयास मिळणार आहे.  'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात एका गाण्यावर धमाल डान्स करताना रिंकु आपल्याला दिसेल.तू गं दुर्गा तू भवानी, संसाराची तूच जननीसारी माया तुझी, आंबे कृपा करीया गाण्यावर रिंकु नाचली. यात तिने धारण केलेला दुर्गावतार पाहण्यासारखा आहे. रिंकुसह अनेक कलाकारांनी या पुरस्कार सोहळ्यात स्त्री गौरवाच्या गाण्यावर आपली कला सादर केली. यामध्ये रिंकूने ‘मी रात टाकली’, ‘चिंब पावसाने रान झालं आबादानी’ आणि ‘तू गं दुर्गा तू भवानी’ या गाण्यांवर नृत्याचा ठेका धरला.