Join us

अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत नवा ट्विस्ट, अर्जुन अर्पणाला भेटणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 18:40 IST

अर्जुन अप्पीजवळ पोहोचू शकेल का? अर्जुन आणि अप्पीची भेट होणार का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत.

'अप्पी आमची कलेक्टर' (Appi Aamchi Collector) मालिका आता ही मालिका रोमांचक वळणावर आली आहे. अर्जुन अप्पीजवळ पोहोचू शकेल का? अर्जुन आणि अप्पीची भेट होणार का? असे प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत अनेक रोमांचक घटना घडत आहेत. अनेक ट्विस्ट या  मालिकेत घडणार आहेत. आतापर्यंतच्या भागात प्रेक्षकांनी पाहिलं की अर्जुनची कोर्टात सुनावणी आहे आणि अप्पीला खूप ताप असल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केलेले आहे. 

 अर्जुनची अत्यंत द्विधा मनस्थिती झाली असून त्याला अप्पीची खूप काळजी वाटते आहे. सर्व परिस्थिती आणि पुरावे अर्जुनच्या विरोधात आहेत तर दुसरीकडे हॉस्टिपलमध्ये डॉक्टर सांगतायत अप्पीचा ताप उतरला नाही तर तिच्या बाळाला धोका होऊ शकतो. घरचे सर्व खूप घाबरले आहेत. अर्जुन अप्पीच्या भोवती जणू संकटांचे काळे ढग जमून आले आहेत, आता येईल का त्यातून एखादा सोनेरी आशेचा किरण ? आता ह्या सगळ्यातुन अर्जुनची सुटका होणार की त्याला शिक्षा होईल ? अर्जुन अप्पीला भेटू शकेल का ? आता या सगळ्यातून अर्जुनची सुटका होणार की त्याला शिक्षा होईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला लवकरच मिळतील. 

'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत अप्पी अर्थात अपर्णा मानेच्या भूमिकेत शिवानी नाईक आहे. अतिशय खडतर प्रवास करत मेहनतीने आणि जिद्दीने अप्पीने स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन गावाचे नाव उंचावर नेऊन ठेवले आहे. तिच्या कलेक्टर होण्यामुळे सगळ्या गावाला तिचा अभिमान वाटतो.

टॅग्स :झी मराठी