Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तारक मेहता का छोटा चष्मा २' आणि 'ऑगी अँड द कॉक्रोचेस' शिवाय आणखी शो येणार बच्चेकंपनीच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 19:08 IST

आता 'ऑगी अँड द कॉक्रोजेस' या, दशकातील सर्वात लोकप्रिय बाल कार्यक्रमाचा समावेश झाला आहे.

छोट्या प्रेक्षकांना त्यांचे आवडते विविध शो आणि व्यक्तिरेखा दाखविण्यासाठी सोनी YAY! या चार वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या वाहिनीला बच्चेकंपनीची पसंती मिळते आहे. या वर्षाच्या सुरुवातीला या चॅनलने आपल्या छोट्या प्रेक्षकांना तारक मेहता का छोटा चष्मा या कार्यक्रमाची मेजवानी सादर केली, जो २०२१ या वषी सर्वात लोकप्रिय किड्स शो ठरला. आपल्या लहानग्या चाहत्यांसाठी कंटेन्ट पोर्टफोलियोमध्ये अजून भर घालण्यासाठी या सणासुदीच्या हंगामात चॅनलतर्फे त्यांना १४० हून अधिक तासांचा ताजा कंटेन्ट उपलब्ध करून देणार आहे.

चॅनेलतर्फे आगामी सणासुदीच्या हंगामासाठी त्यांच्या ताज्या कंटेन्टचा बहुप्रतीक्षित लाइन-अप जाहीर केला आहे. यात मौजमजा, मैत्री आणि हास्यरस असलेल्या कार्यक्रमांचा समावेश आहे. या तारांकित लाइन-अपमध्ये YAY! टून्सच्या सतत विस्तारित होणाऱ्या विश्वात एक मोठी भर घातली गेली आहे. आता 'ऑगी अँड द कॉक्रोजेस' या, दशकातील सर्वात लोकप्रिय बाल कार्यक्रमाचा समावेश झाला आहे. 'तारक मेहता का छोटा चष्मा' या सोनी YAY!च्या या कॅटेगरीतील पहिल्या ओरिजिनल शोनंतर याच मालिकेतील दुसऱ्या सीझनच्या निमित्ताने सणासुदीचे सेलिब्रेशन अधिक जोमाने होणार आहे. त्याचप्रमाणे चॅनल आपल्या छोट्या चाहत्यांसाठी 'हसते रहो हेन्री' या नव्या सीरिज सादर करणार आहे.

ऑक्टोबरमध्ये 'ऑगी अँड द कॉक्रोचेस' हा शो घेऊन येत आहेत आणि या शोला एक खास ट्विस्टही देण्यात आला आहे. या 'चेस कॉमेडी' प्रकारातील शोला त्याच्या अनपेक्षित कथानकामुळे आणि गमतीदार पाठलागामुळे छोटे प्रेक्षक हसून हसून लोटपोट होतात. यानंतर, टीव्हीवर सर्वात लोकप्रिय असलेली गोकुलधाम सोसायटी, ताजे एपिसोड्स, क्रेझी अॅडव्हेंचर्स, गमतीदार गोंधळ यामुळे 'तारक मेहता का छोटा चष्मा सीझन २' मध्ये मुले आणि त्यांचे कुटुंबिय हास्यजत्रेचा आनंद लुटतील.त्या पुढेही जाऊन आपला दमदार कंटेन्ट सादर करत चॅनलने 'ओबोचामा-कुन' या लोकप्रिय शोजे ताजे एपिसोड्स सादर करत आपला सणासुदीच्या कंटेन्टच्या शृंखलेची सुरुवात केली आहे. या शोमधला श्रीमंत आणि खट्याळ मुलगा आपल्या चित्रविचित्र साहसांनी लहानग्यांची हसून हसून पुरेवाट करतो. या महिन्याच्या पुढील टप्प्यात हसते रहो हेन्रीसह या चॅनलवर अजून एक खोडकर मुलगा पदार्पण करणार आहे. 'हनी बनी का झोलमाल'चे नवे एपिसोड्स आणि या दोघा लोकप्रिय बोक्यांच्या मायावी, गूढ आणि मजेशीर धाडसकथा बच्चेकंपनीला पाहायला मिळणार आहेत. त्याचप्रमाणे चॅनल 'पाप-ओ-मीटर मूव्हीज' आणि 'पाप-ओ-मीटर' या मुलांच्या आवडत्या घोस्ट कॉमेडीचे नवे एपसोड्स सादर करणार आहे.