Join us

बिग बॉसच्या घरात अपर्णा टिळकची वाइल्ड कार्ड एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2016 18:10 IST

टीव्ही शो ‘लेफ्ट राइट लेफ्ट’ फेम अभिनेत्री अपर्णा टिळक लवकरच बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री करणार आहे. सूत्रानुसार ...

टीव्ही शो ‘लेफ्ट राइट लेफ्ट’ फेम अभिनेत्री अपर्णा टिळक लवकरच बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री करणार आहे. सूत्रानुसार या विकेंडला ती बिग बॉसच्या घरात एंट्री करणार असून, या सीझनची वाईल्ड कार्ड एंट्री करणारी अपर्णा पहिली स्पर्धक असेल. या शोसाठी अपर्णाने देखील तयारी केली असून, बिग बॉसच्या घरात जाण्यास ती उत्सुक आहे. अपर्णा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक शो केले आहेत. ‘फॅमिली नंबर वन, जीत और कोई अपना सा, लेफ्ट राइट लेफ्ट’ या शोमधून ती घराघरात पोहोचली आहे. त्याचबरोबर तिने भट्ट कॅम्पच्या ‘फुटपाथ’ या चित्रपटात देखील अभिनेता इमरान हश्मी याच्यासोबत काम केले आहे. चित्रपटात बिपाशा बसू, आफताब शिवदासानी हे देखील होते. अपर्णाने या चित्रपटात इंग्लिश टीचरची भूमिका साकारली होती. ‘फुटपाथ’ चित्रपटात अभिनेता इमरान हाशमी याच्यासोबत अर्पणा टिळकरियल लाइफमध्ये डॉक्टरशी विवाहअपर्णाने रियल लाइफमध्ये डॉक्टरशी विवाह केला असून, तिच्या पतीचे नाव डॉ. आमोद असे आहे. आमोद एक चांगला बॅडमिंटन खेळाडू देखील आहे. विशेष म्हणजे आमोद अपर्णापेक्षा १२ वर्षाने मोठा आहे. अपर्णा सध्या टीव्हीमध्ये अ‍ॅक्टिव्ह नसून, बिग बॉसच्या शोमधून ती पुन्हा एकदा टीव्हीवर परतू शकते. अपर्णाचा शांत स्वभावअपर्णा टिळक ही शांत स्वभावाची असून, बिग बॉसच्या घरात तिचा वावर बघण्यासारखा असेल. सूत्रानुसार अपर्णा घरातील सदस्यांबरोबर वाद घालण्याऐवजी गेम खेळण्यासाठी वेगळी निती वापरणार असल्याचे समजते. सध्या बिग बॉसच्या घरात राहुल देव, गौरव चोपडा, व्ही. जे. बानी, रोहन मेहरा, लोपामुद्रा राऊत, मोनालिसा, ओम स्वामी, मनु पंजाबी, मनवीर गुज्जर आणि नीतिभा कौल हे स्पर्धक आहेत. सध्या सर्वच स्पर्धक जोशात असून, प्रत्येकांचे दुसºयाबरोबर मतभेद झाल्याचे आतापर्यंत समोर आले आहे. अशात अपर्णाची एंट्री काय बदल घडवून आणणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच.