Join us
Daily Top 2Weekly Top 5

हीच का ती ? 'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील स्वीटू, फोटो पाहून तुम्हाला ही पडेल प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 14:07 IST

ओम आणि स्वीटूमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली आहे.

सध्या झी मराठीवर 'येऊ कशी तशी मी नांदायला' ही मालिका फार गाजते आहे. या मालिकेतील ओम आणि स्वीटूमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली आहे. मालिकेतील नायिका स्वीटूने आपल्या निरागस आणि सोज्वळतेने सगळ्यांचं लक्षं आपल्याकडे वेधून घेतलं आहे. स्वीटूची भूमिका साकारत असलेल्या अभिनेत्रीचं नाव अन्विता फलटणकर आहे. 

 अन्विता फलटणकर सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते आणि त्यांना चाहत्यांची देखील पसंती मिळते. अन्विताच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर नजर टाकली तर लक्षात येतं खऱ्या आयुष्यात स्वीटू खूपच स्टायलिश आहे. अलिकडेच तिने इन्स्टाग्रामवर गॉगलमधला एका फोटो शेअर केला आहे. ज्यात ती खूपच स्टायलिश दिसते आहे. चाहत्यांना ही तिचा हा अंदाज आवडला आहे. लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव त्यानी या फोटोवर केला आहे. 

अन्विताने याआधीही मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. रवी जाधव दिग्दर्शिक 'टाईमपास'मध्ये केतकी माटेगावकरच्या मैत्रिणीची भूमिका अन्विताने साकारली होती. यानंतर 2019मध्ये आलेल्या गर्ल्स या सिनेमात अन्वितान 'रुमी'च्या भूमिकेत झळकली होती. Why so गंभीर या नाटकातही तिने काम केलं आहे. अन्विताने चार वर्षांची असताना भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. ‘चतुर चौकडी’ आणि 'रुंजी' या मालिकेतही तिने काम केलं. 

टॅग्स :झी मराठी