Join us

​रायजिंग स्टारमध्ये अनुष्का शर्माचा फिल्लोरी परफॉर्मन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2017 14:26 IST

रायजिंग स्टार या कार्यक्रमात सगळे स्पर्धक एकापेक्षा एक चांगले परफॉर्मन्स सादर करत आहेत. या स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक कलाकार ...

रायजिंग स्टार या कार्यक्रमात सगळे स्पर्धक एकापेक्षा एक चांगले परफॉर्मन्स सादर करत आहेत. या स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक कलाकार या कार्यक्रमात हजेरी लावतात. नुकताच अभिनेता गोविंदा या कार्यक्रमात आला होता. गोविंदाचा लाइव्ह परफॉर्मन्स प्रेक्षकांना या कार्यक्रमात पाहायला मिळाला होता आणि आता त्याच्यानंतर आणखी एका कलाकाराचा लाइव्ह परफॉर्मन्स प्रेक्षकांना या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. फिल्लोरी या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी नुकतीच अनुष्का शर्मा रायजिंग स्टार या कार्यक्रमाच्या सेटवर गेली होती. या चित्रपटात ती केवळ काम करत नाहीये तर या चित्रपटाची निर्मितीदेखील तिने केली आहे. तिने याआधी एनएच 10 या चित्रपटाची निर्मिती केली होती. फिल्लोरी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कमतरता राहू नये यासाठी ती सध्या खूप मेहनत घेत आहे. फिल्लोरी या चित्रपटात दिलजीत दोसांज प्रमुख भूमिकेत झळकत आहे. दिलजीत हा रायजिंग स्टारमध्ये परीक्षकाची भूमिका बजावतो. त्याच्यासोबत अनुष्कानेदेखील या कार्यक्रमात नुकतीच परीक्षकाची भूमिका बजावली. या कार्यक्रमात अनुष्काने फिल्लोरीचे नॉटी बिल्लो हे गाणे लाँच केले. तिने हे गाणे लाँच करताना लाइव्ह परफॉर्मन्सदेखील दिला. दलजीत आणि अनुष्काने हा परफॉर्मन्स सादर करत कार्यक्रमाला चार चाँद लावले. या दोघांचा हा परफॉर्मन्स या कार्यक्रमाचे परीक्षक शंकर महादेवन, सूत्रसंचालक आणि सगळ्याच उपस्थितांना खूप आवडला. अनुष्का रायजिंग स्टार या कार्यक्रमात आली असल्याने या कार्यक्रमातील स्पर्धकदेखील खूश झाले होते. एवढेच नव्हे तर या भागात दोन वाईल्ड कार्ड एंट्रीदेखील होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या कार्यक्रमाची नक्कीच उत्सुकता लागली असणार.