Join us
Daily Top 2Weekly Top 5

​अनुष्का दांडेकर आणि किश्वर मर्चंटमध्ये सुरू झाले शीतयुद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2017 17:27 IST

अनुष्का दांडेकरने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि या व्हिडिओमुळे सध्या चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे. ...

अनुष्का दांडेकरने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि या व्हिडिओमुळे सध्या चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे. या व्हिडिओत अनुष्का आणि तिची फ्रेंड गॅलीन एका टिव्ही अभिनेत्रीची खिल्ली उडवताना आपल्याला दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती प्रसिद्ध अभिनेत्री किश्वर मर्चंटच्या मित्र मैत्रिणीची खिल्ली उडवत आहे. हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर चांगलाच व्हायरल झाला आहे. पण हा व्हिडिओ पाहून किश्वर चांगलीच चिडली आहे. किश्वर आणि तिचा नवरा सुयश राय यांनी या व्हिडिओवरून अनुष्काला चांगलेच धारेवर धरले आहे. अनुष्काने किश्वरच्या मैत्रिणींच्या अॅक्सेंटवरून त्यांना चिडवले आहे. या सगळ्यामुळे चांगलाच वाद रंगला आहे. अनुष्काने नुकतेच किश्वर आणि सुयशला यावर उत्तर दिले आहे.अनुष्काने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून किश्वर आणि सुयशला उत्तर दिले आहे. तिने पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी खूप वेळापासून शांत बसले आहे. मला आजवर लोकांकडून जे प्रेम आणि पाठिंबा मिळाला आहे, त्यासाठी मी तुमची ऋणी आहे. माझा जन्म आफ्रिकेत झाला असून माझे बालपण अमेरिकेत आणि ऑस्ट्रलियात गेले आहे. मी माझ्या मातृभूमीत माझा अधिकाधिक वेळ घालवला आहे. माझा अॅक्सेंट वेगळा असल्यामुळे वंशभेदावरून माझ्यावर बोट का दाखवले जात आहे. हा वंशभेद नाही आहे का तो काय बोलला त्यावर आम्ही केवळ 10 सेकंद हसलो. त्यांचे इंग्लिश अथवा त्यांच्या अॅक्सेंटवर मला काहीही बोलायचे नाही आहे. ते जे काही बोलले त्याचीच आम्ही नक्कल केली आहे.