Join us

अनुराग बसूने मिष्टी सिन्हाला दिली बॉलिवूड सिनेमाची ऑफर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 15:25 IST

मिष्टी सिन्हा 'सुपर डान्सर' सिझन 2 मध्ये आपल्या अप्रतिम नृत्य कौशल्याने नेहमीच सर्वांना प्रभावित करत असते. तिच्या डान्स स्टेप्स ...

मिष्टी सिन्हा 'सुपर डान्सर' सिझन 2 मध्ये आपल्या अप्रतिम नृत्य कौशल्याने नेहमीच सर्वांना प्रभावित करत असते. तिच्या डान्स स्टेप्स आणि चेह-यावरचे हावभाव नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेतात आणि त्यामुळे सारेच तिचे कौतुक करत असतात.पण यावेळी या 10 वर्षाच्या लहानग्या मुलीला आश्चर्याचा धक्काच बसला,जेव्हा अनुराग बसू फक्त तिचे कौतुक करून थांबला नाही तर त्याने तिला स्वतःच्या आगामी चित्रपटात एक भूमिकाचा ऑफर केली आहे.परीक्षकाचे काम करणार्‍या दिग्दर्शक अनुराग बसूला वाटते की मिष्टी ही एक चांगली अभिनेत्री आहे आणि ती आपल्या नृत्यातून या गोष्टी दिसतात.तिच्या नृत्यानंतर, आपल्या आगामी चित्रपटात तिला एक भूमिका देऊ करून त्याने तिला खूप चांगले सरप्राईज दिले असून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.तो या गोष्टीची देखील काळजी घेईल की चित्रपटाच्या शेड्यूलमुळे तिच्या अभ्यासावर परिणाम होणार नाही. याविषयी अनुराग बसूने सांगितले की, “मला मिष्टीमध्ये एक उत्कृष्ट अभिनेत्री दिसते आहे. ती फक्त एक उत्तम डान्सरच नाही तर तिच्या एक चांगला कलाकारही मला दिसतो.आपल्या निरागसतेने आणि हावभावांनी ती मंच गाजवते.यामुळे मला तिला भूमिका द्यावीशी वाटली. नॅशनल टेलिव्हीजनवर मी तिला हे वचन दिले आहे आणि ते पूर्ण करण्याची काळजी मी घेईन. तसेच तिने अभ्यासाशी कधीच तडजोड करता कामा नये असे वचनही मी तिच्याकडून घेतले आहे.Also Read: अमिताभ बच्चन यांच्या ‘रंग बरसे’वर रेखाने लावले ठुुमके...पाहा फोटो!बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा हिच्याकडे बघताना आजही पापणी लवत नाही. खरे तर रेखा फार कमी रिअ‍ॅलिटी शोमध्ये हजेरी लावते. पण अलीकडे रेखाने ‘सुपर डान्सर2’च्या शो सेटवर हजेरी लावली.या रिअ‍ॅलिटी शोच्या मंचावर शेखा सर्व स्पर्धकांना प्रेरणा देताना दिसली. रेखाला मुले आवडतात. रेखानेही ‘सुपर डान्सर2’च्या मंचावर ठेका धरल्याचे पाहायला मिळाले.अमिताभ यांच्या गाण्यावर रेखाने स्पर्धकांसह ठेका धरत सा-यांनाच थिरकायला भाग पाडल्याचे पाहायला मिळाले.