छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'अनुपमा' सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. मालिकेची मुख्य अभिनेत्री रुपाली गांगुली हिचा एक लांबलचक संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिच्या या 'रुद्रावतारा'ची तुलना आता थेट सनी देओलशी केली जात आहे. एकीकडे तिचे चाहते या परफॉर्मन्सचं कौतुक करत असले, तरी दुसरीकडे नेटकऱ्यांनी मात्र तिला ट्रोल करण्याची एकही संधी सोडलेली नाही.
रुपालीने स्वतः तिच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या दृश्यात जेव्हा 'रिंकू' रुपालीला आव्हान देते, तेव्हा रुपाली एका दमात तिला धमकीवजा इशारा देते. ती म्हणते, "मी तुला मारेन, केसांनी पकडून ओढेन, बाजाराच्या मध्यभागी आणून तुझी धुलाई करेन... माझे हात थकले तर लाथ मारेन आणि पाय थकले तर शब्दांनी मारेन". हा व्हिडीओ पाहून प्रेक्षक थक्क झाले आहेत.
नेटकऱ्यांकडून 'मीम्स'चा वर्षावहा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला आहे. अनेकांनी रुपालीच्या या संवादाची तुलना सनी देओलशी केली आहे. एका नेटकऱ्यानं लिहिलं, "ही तर सनी देओलची अल्ट्रा प्रो मॅक्स आवृत्ती आहे". दुसऱ्याने गंमतीत म्हटले, "गणिताच्या परीक्षेत २ गुण मिळाल्यावर माझ्या आईची प्रतिक्रिया अगदी अशीच असते". तर कुणी म्हटले, "जेव्हा उत्तर एका शब्दाचे असते पण प्रश्न ५ गुणांचा असतो, तेव्हा मी असाच लिहितो".
सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. रुपालीच्या चाहत्यांना तिचा हा मोनोलॉग आवडला आहे. मात्र, ट्रोलर्सच्या मते हे दृश्य अत्यंत विनोदी आणि 'ओव्हर' वाटत आहे. रुपालीच्या या डायलॉग डिलिव्हरीमुळे आता हा व्हिडीओ 'अनुपमा' मालिकेतील आजवरच्या सर्वात जास्त व्हायरल झालेल्या क्लिप्सपैकी एक ठरला आहे.
Web Summary : Rupali Ganguly's intense monologue in 'Anupama' has gone viral, drawing comparisons to Sunny Deol. While fans praise her performance, others are creating memes. The scene, where Anupama threatens Rinku, has divided viewers, making it a trending clip.
Web Summary : 'अनुपमा' में रूपाली गांगुली का तीव्र मोनोलॉग वायरल हो गया है, जिसकी तुलना सनी देओल से की जा रही है। जहां प्रशंसक उनके प्रदर्शन की प्रशंसा कर रहे हैं, वहीं अन्य लोग मीम्स बना रहे हैं। अनुपमा द्वारा रिंकू को धमकाने वाले दृश्य ने दर्शकों को विभाजित कर दिया है, जिससे यह एक ट्रेंडिंग क्लिप बन गई है।