Join us
Daily Top 2Weekly Top 5

'अनुपमा' मालिकेतील अभिनेता नितेश पांडेचं निधन, वयाच्या ५१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 10:32 IST

Nitesh Pandey : अभिनेता नितेश पांडेचा २३ मे रोजी रात्री हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला.

'अनुपमा' मालिकेत रुपाली गांगुलीची मैत्रिण देविकाच्या पतीची भूमिका साकारणाऱ्या नितीश पांडे(Nitesh Pandey)चे निधन झाले आहे. २३ मे रोजी रात्री हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्याचा मृत्यू झाला. अभिनेता ५१ वर्षांचा होता. त्याच्या निधनामुळे टेलिव्हिजन जगतावर शोककळा पसरली आहे. यापूर्वी 'साराभाई व्हर्सेस साराभाई' अभिनेत्री वैभवी उपाध्याय यांच्या निधनाच्या बातमीने इंडस्ट्रीत शोककळा पसरली होती आणि आता नितीश पांडे यांच्या जाण्याने लोकांनाही धक्का बसला आहे.

अभिनेता नितेश पांडे यांच्या आकस्मित निधनाने त्यांचे कुटुंबिय आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. वयाच्या ५० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नितीश पांडेचा जन्म १७ जानेवारी १९७३ रोजी झाला. त्यांनी चित्रपट आणि टीव्हीच्या जगतात काम केले आहे. 'ओम शांती ओम' चित्रपटात तो शाहरुख खानच्या असिस्टंटच्या भूमिकेत दिसला होता. त्याच वेळी, तो दिशा परमार आणि नकुल मेहता स्टारर शो 'प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यार' मध्ये देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता.

अर्पिता पांडेशी केलं दुसरं लग्न

नितीश पांडेच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे तर त्यांनी अश्विनी काळसेकर यांच्याशी लग्न केले होते. १९९८ मध्ये दोघांनी सात फेरे घेतले पण नंतर २००२ मध्ये दोघे वेगळे झाले. त्यानंतर त्याने टीव्ही अभिनेत्री अर्पिता पांडेशी लग्न केले.

मालिकेसोबत सिनेमातही केलं होतं काम

नितीश पांडे यांनी १९९५ पासून टेलिव्हिजन जगतात काम करण्यास सुरुवात केली. 'तेजस', 'सया', 'मंजिलें अपनी अपनी', 'जस्तजू', 'हम लड़कियाँ', 'सुनैना', 'कुछ तो लोग कहेंगे', 'एक रिश्ता पार्टनरशिप का', 'महाराजा की' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. तो 'अनुपमा'मध्ये धीरज कपूरच्या भूमिकेत दिसला होता. याशिवाय त्याने 'बधाई दो', 'मदारी', 'दबंग २' सारख्या चित्रपटातही काम केले.