Join us

अनुपम श्यामनेसाठी 'ही' गोष्ट आहे लक्की चार्म!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 13:53 IST

खलनायकी भूमिकांमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता अनुपम श्याम सध्या ‘स्टार प्लस’वरील ‘कृष्णा चली लंडन’ या मालिकेत लंबोदर शुक्लाची (बडे पापा) भूमिका साकारीत असून या व्यक्तिरेखेला नकारात्मक छटा आहे.

ठळक मुद्दे''माझा दैवावर विश्वास असून या स्कार्फने आजवर मला नेहमीच चांगली साथ दिली आहे.''

खलनायकी भूमिकांमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता अनुपम श्याम सध्या ‘स्टार प्लस’वरील ‘कृष्णा चली लंडन’ या मालिकेत लंबोदर शुक्लाची (बडे पापा) भूमिका साकारीत असून या व्यक्तिरेखेला नकारात्मक छटा आहे. या पात्राचा भूतकाळ रहस्यमय आहे. या भूमिकेचे एक वैशिष्ट्य म्हणजे बडे पापा यांचे आधुनिक आणि फॅशनेबल कपडे! शुक्ला परिवारातील अन्य सदस्यांमध्ये आणि त्याच्यात मुख्य फरक आहे की तो जग फिरून आला असल्याने त्याचा वेश आधुनिक आहे. त्याचे रूप आणि वेश हे त्याच्या परदेशी प्रवासामुळे बदलले असले, तरी त्याचा स्कार्फ मात्र अस्सल देशी आहे.

अनुपम सांगतो, “संपूर्ण शुक्ला कुटुंबियांमध्ये बडे पापा हे आपादमस्तक अगदी आधुनिक आणि फॅशनेबल कपड्यांमध्ये दिसतात. ‘कृष्णा चली लंडन’ मालिकेतील माझ्या या आधुनिक भूमिकेला आणि वेशभूषेला साजेसा म्हणून मला एक स्कार्फ गळ्याभोवती टाकावा लागतो आणि या स्कार्फवर सुंदर भरतकाम केलेलं आहे. पण अनेकांना ही गोष्ट ठाऊक नसेल की मी हा स्कार्फ माझ्या मूळ गावाहून, उत्तर प्रदेशातील अलाहाबादमधून आणलेला आहे. माझा दैवावर विश्वास असून या स्कार्फने आजवर मला नेहमीच चांगली साथ दिली आहे. हा स्कार्फ म्हणजे माझी सर्वात आवडती वस्तू असून मी मुंबईत चित्रीकरण करीत असतो, तेव्हा हा मला माझ्या घराची आठवण करून देतो. प्रेक्षकांना मला या वेशभूषेत पाहायला आवडत असेल, अशी मी आशा करतो.” या मालिकेत बडे पापांच्या प्रवेशामुळे नाट्यमय बदल होणार असून शुक्ला कुटुंबियांचे जीवन पार बदलून जाणार आहे.

टॅग्स :स्टार प्लस