अनुपम खेर बनले निर्माता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2016 15:24 IST
ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर आता निर्मिती क्षेत्रात एंट्री मारलीय. अनुपम खेर यांची निर्मिती असलेली मालिका लवकरच रसिकांच्या भेटीला येणार ...
अनुपम खेर बनले निर्माता
ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर आता निर्मिती क्षेत्रात एंट्री मारलीय. अनुपम खेर यांची निर्मिती असलेली मालिका लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. 'ख्वाबों की जमीं पर' या मालिकेची निर्मिती अनुपम खेर करतायत. या मालिकेच्या निमित्ताने अनुपम खेर पहिल्यांदाच निर्माता म्हणून छोट्या पडद्यावर एंट्री करणार आहेत. मालिकेत मेघा चक्रवर्ती,दिक्षा सोनाळकर,आशिष कश्यप यांच्या प्रमुख भूमिका अाहेत.या मालिकेविषयी अनुप खेर म्हणतात,एका छोट्याशा गावांतून मी आलोय. एक अभिनेता म्हणून घडतांना अनेक संघर्षांचा सामना करावालागला.मला आलेले कटू-गोड अनुभव मालिकेतही दाखवण्याचा प्रयत्न केलाय. ही मालिका प्रत्येकाला एक प्रेरणा देणारी ठरेल असे अमुपम खेर यांनी म्हटलंय.