Join us
Daily Top 2Weekly Top 5

Anupama : 'अनुपमा आणि अनुज' झाले रोमॅन्टिक, KISS आणि इंटिमेट सीन बघून प्रेक्षक म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 09:48 IST

मुख्य भूमिकेत असलेली 'अनुपमा' सहकलाकारासोबत इंटिमेट होताना आणि त्यांच्या रोमान्सचा सीन शूट करण्यात आला आहे.

Anupama : हिंदीतील लोकप्रिय मालिका अनुपमा सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे. मालिकेत प्रेमाचे वारे वाहत आहेत. इतकंच नाही तर मुख्य भूमिकेत असलेली 'अनुपमा' सहकलाकारासोबत इंटिमेट होताना आणि त्यांच्या रोमान्सचा सीन शूट करण्यात आला आहे. अनुपमा आणि अनुज यांच्या केमिस्ट्रीची जोरदार चर्चा होत आहे. या दोघांमधील रोमॅन्टिक सीन्स आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

अनुपमाने अनुजसाठी सरप्राईज प्लॅन केले आहे. त्यांच्यातील टेन्शन, दुरावा दूर करण्याचा अनुपमाचा हा प्रयत्न आहे. यात तिला यशही आले आहे. या एपिसोडमध्ये दोघांनाही एकमेकांच्या प्रेमात हरवलेले दाखवले गेले आहे. दोघेही एकमेकांना किस करतानाचाही क्षण आहे. दोघांचा हा रोमॅन्टिक वेळ बघून चाहतेही खूश झाले आहेत. या सिझलिंग केमिस्ट्रीने चाहत्यांना वेडं केलं आहे.

या फोटो, व्हिडिओवर प्रेक्षक कमेंट करत आहेत. दोघेही नवीन जोडप्यासारखे वाटत असल्याचं चाहते म्हणत आहेत. दोघांमध्येही सगळं पहिल्यासारखं सुरळित होईल अशीच ही चिन्ह आहेत. अनुपमा मालिका बऱ्याच काळापासून टीआरपी मध्ये नंबर १ वर आहे. आता या केमिस्ट्रीमुळे तर शो ला आणखी फायदा मिळण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :हिंदीस्टार प्लस