Join us

‘कसम तेरे प्यार की’मधून आणखी एक एक्झिट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2016 13:26 IST

'कसम तेरे प्यार की' या छोट्या पडद्यावरील मालिकेतून काही दिवसांपूर्वी क्रातीका धीरनं एक्झिट घेतली होती.क्रातीकाच्या एक्झिटनंतर या मालिकेला आणखी ...

'कसम तेरे प्यार की' या छोट्या पडद्यावरील मालिकेतून काही दिवसांपूर्वी क्रातीका धीरनं एक्झिट घेतली होती.क्रातीकाच्या एक्झिटनंतर या मालिकेला आणखी एक धक्का बसणार आहे.कारण मालिकेतून झुबेर के खान यानं एक्झिट घेण्याचा निर्णय घेतलाय.या मालिकेनं आता 20 वर्षांचा लीप घेतलाय.त्यामुळं या मालिकेत भूमिका साकारणा-यांचं वय वाढल्याचंही दाखवण्यात आलंय.मालिकेतील इतर कलाकारांना यामुळं फरक पडणार नसला तरी या क्षणी वडिलांची भूमिका साकारण्याचा धोका पत्करु शकत नसल्याचं झुबेर के खान यानं म्हटलंय.आपल्या या निर्णयाबद्दल निर्मात्यांना कळवून झुबेर आपल्या पूर्वनियोजित कमिटमेन्ट्स पूर्ण करण्यासाठी परदेशात गेलाय.