छोट्या पडद्यावरच्या अनेक जोड्यांचे सध्या ब्रेकअप होत आहे. या यादीत आणखी एका नावाची भर पडणार आहे. विवियन डिसेना आणि वहबिझ दोराबजी हे छोट्या पडद्यावरील क्यूट कपल सध्या वेगळे राहात असल्याची चर्चा आहे. या दोघांची प्यार की ये एक कहानी या मालिकेच्या सेटवर भेट झाली. त्यानंतर 2013मध्ये त्यांनी लग्न केले. विवियन आणि वहबिझ अंधेरी येथे राहातात. पण विवियनने आता अंधेरी येथील त्या दोघांचे घर सोडले असून तो दुसरीकडे राहात असल्याचे म्हटले जात आहे.
अजून एक ब्रेकअप ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2016 12:43 IST