Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ऍनी गिलचं ‘टशन-ए-इश्क’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 14:46 IST

अनामिका फेम ऍनी गिल लवकरच 'टशन-ए-इश्क' या मालिकेत एंट्री मारणार आहे. या मालिकेत ऍनी ट्विंकल ( जस्मिन भसिन) च्या ...

अनामिका फेम ऍनी गिल लवकरच 'टशन-ए-इश्क' या मालिकेत एंट्री मारणार आहे. या मालिकेत ऍनी ट्विंकल ( जस्मिन भसिन) च्या मैत्रिणीच्या भूमिकेत पाहायला मिळेल. कुंज आणि युवी या दोघांपैकी कुणाला जीवनाचा साथीदार निवडावं अशा द्विधा मनस्थितीत ट्विंकल सापडलीय.या टेन्शनमुळं ती वैतागली असून थोडे निवांत क्षण मिळावे म्हणून ती मसुरीला जाते.. तिथंच ट्विंकल आणि ऍनी साकारत असलेल्या पात्राची भेट होणार आहे. दोघींमध्ये चांगली मैत्री होऊन ब-याच गोष्टी शेअर करताना पाहायला मिळतील.त्यामुळं आता ऍनीच्या एंट्रीनंतर काय होणार, ट्विंकल कुंज आणि युवीपैकी कुणाला आपला जीवन साथीदार बनवणार याची उत्तरं मालिकेत रसिकांना मिळणार आहेत.