Join us
Daily Top 2Weekly Top 5

'डान्स महाराष्ट्र डान्स'च्या मंचावर सुपरस्टार अंकुश चौधरी का झाला भावुक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 11:59 IST

दमदार आणि उत्कृष्ट परफॉर्मन्सेस सादर करून झी युवावरील डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमाने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे.कार्यक्रमातील तुफान स्पर्धकांमुळे ...

दमदार आणि उत्कृष्ट परफॉर्मन्सेस सादर करून झी युवावरील डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमाने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे.कार्यक्रमातील तुफान स्पर्धकांमुळे ही स्पर्धा दिवसेंदिवस जास्तच अवघड होत चालली आहे. या कार्यक्रमात नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी नवीन पाहायला आणि अनुभवायला मिळते.मागील आठवड्यात महाराष्ट्राला याड लावणाऱ्या सुपरहिट चित्रपट 'सैराट'च्या टीमने या मंचावर धमाल केली तर या आठवड्यात महाराष्ट्र दिवससाजरा करण्यासाठी स्टाईल आयकॉन आणि महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरीने या मंचावर चार चांद लावले.चॉकलेट हिरो डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावर सज्ज झालेला असताना त्याला एक खास भेट देण्यात आली अखंड महाराष्ट्राला हा स्टाईल आयकॉन किती प्रिय आहे हे सांगणारे एक पत्र त्याच्यासाठी सुव्रत जोशी याने वाचले.एक अभिनेता बनण्यासाठी अंकुशने केलेल्या स्ट्रगलची सुरुवात या पत्रातून उलगडली.शाहीर साबळे यांच्या लोकधारेतून त्याचा अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि या प्रवासात केदार शिंदे आणि भरत जाधव या त्याच्या घनिष्ट मित्रांनी त्याला अखंड साथ दिली.असंख्य अडचणींवर मात करून सदैव हसतमुखाने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज असलेल्या या स्टाईल आयकॉनचा अभिनेता ते महाराष्ट्राचा सुपरस्टारपर्यंतचा संपूर्ण प्रवास या पत्रातूनप्रेक्षकांच्या समोर आला.सगळ्यांचे आपल्यावरील हे प्रेम पाहून अंकुशचे डोळे पाणावले.हे पत्र वाचल्यानंतर अंकुशकडे त्याच्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्दच नव्हते. त्याने सर्वांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.महाराष्ट्र दिनानिमित्त डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावर महाराष्ट्राची अस्मिता, परंपरा, अभिमान आणि संस्कृती साजरी करण्यात अली.प्रथमेश आणि श्वेता महाराष्ट्राची अध्यात्मिकता दाखवणारे 'वारी'नृत्य सादर करणार आहेत.प्रत्येकवेळी परीक्षकांची दाद मिळवणारा ओम डान्स ग्रुप यावेळी गोंधळ सादर करणार आहे शिवाजी आणि तानाजी मालुसरे यांची 'कोंढाणा किल्ल्याची' ऐतिहासिक कथा गॅंग १३ आपल्या परफॉर्मन्समधून प्रेक्षकांना सांगणार आहेत.फीलग्रुप लोकमान्य टिळक या महापुरुषाची जीवन गाथा त्यांच्या ऍक्टमधून सादर करणार आहे आणि क्रेझी क्रू त्याच्या परफॉर्मन्समधून किल्ले संवर्धनाचा संदेश प्रेक्षकांना देणार आहेत.वाय३ डान्सहोलिक क्रूने जोगवा, एल अँजल्स यांनी फ्युजन लावणी, वायके ग्रुपने धनगर नृत्य, चेतन साळुंखेने भारूडवर परफॉर्मन्स तर सद्दाम शेख याने ब्लाइंडफोल्ड लावून एक दमदार परफॉर्मन्स सादर केला.