Join us

अंकुश चौधरी बनला बॅन्ड अ‍ॅम्बेसिडर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2016 12:03 IST

मराठी इंडस्ट्रीचा चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी पाठोपाठ तरूणाईच्या मनावर राज्य करणारा अभिनेता अंकुश चौधरी देखील स्टाईल आयकॉन आता एक ...

मराठी इंडस्ट्रीचा चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी पाठोपाठ तरूणाईच्या मनावर राज्य करणारा अभिनेता अंकुश चौधरी देखील स्टाईल आयकॉन आता एक मेन्स क्लोथिंग ब्रँड एन्डॉर्स करणार आहे. हॅशटॅग नावाच्या मेन्स फॅशन ब्रँडने  या स्टायलिश अभिनेत्याची ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून निवड केली आहे. बॉलीवुडमध्ये दिसणारे हे चित्र आता मराठी इंडस्ट्रीट देखील हळूहळू दिसू लागल्यामुळे नक्कीच मराठी इंडस्ट्रीची ही यशस्वी पावतीच म्हणावी लागेल. तसेच अंकुशच्या चाहत्यांसाठी आता पर्वणी ठरेल, द हाउस आॅफ कॉरनियाचे सब-ब्रँड असलेला हॅशटॅग हा ब्रँड तरुणांसाठी फॉरमल, कॅज्युअल, पार्टी आणि एथनिक वेअर मध्ये विविध पर्याय प्रदान करणार आहे. पुण्यामध्ये स्टाईल आयकॉन अंकुशच्या उपस्थितीत हॅशटॅग स्टोअर लाँन्च सोहळा पार पडला.मोठया पडद्यावर आपल्या प्रत्येक भूमिकेमधून स्टाईल आणि फॅशन ट्रेंड सेट करणारा अंकुश आता ट्रेंड्स आणि न्यू स्टाईलकडे कल असलेल्या तरुणाईचा फॅशन आयकॉन या भूमिकेत देखील दिसून येईल.