Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुनेत्रा पवार यांना ट्रोल करणाऱ्यांना अंकिता वालावलकर स्पष्टच बोलली, म्हणाली- "त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणं म्हणजे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 12:50 IST

३१ जानेवारीला सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत कारभार स्वीकारला. यानंतर 'बिग बॉस मराठी' फेम सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर हिने पोस्ट शेअर करत तिचं मत मांडलं आहे. 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला विमान अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. अजित पवारांसह ५ जणांचा या विमान अपघातात मृत्यू झाला. अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी कोण सांभाळणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी एकमताने अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्याचं ठरवलं. ३१ जानेवारीला सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत कारभार स्वीकारला. यानंतर 'बिग बॉस मराठी' फेम सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर हिने पोस्ट शेअर करत तिचं मत मांडलं आहे. 

अंकिताने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने म्हटलं आहे की "सुनेत्रा पवार यांनी शपथ घेणं म्हणजे दुःख नाकारणं नव्हे. कधी कधी जबाबदारी स्वीकारणं हेच दुःखावर उत्तर असतं. काहीजण अशा प्रसंगी कोसळतात तर काहीजण अधिक ठामपणे उभे राहतात. दोन्ही मार्ग मानवीच आहेत. सोशल मीडियावर ट्रोल करणं खूप सोप्प असतं. पण समोरची व्यक्ती काय अनुभवते आहे, तिच्या मनात काय चालू आहे हे आपण जाणत नाही. संवेदनशीलता आणि समजूतदारपणा या गोष्टी आजच्या काळात फार गरजेचे आहेत. राजकारणात टीका होणारच, प्रश्न विचारले जाणारच पण व्यक्तिगत दुःखावर उपहार करणं हे आपल्याच समाजाचं प्रतिबिंब दाखवतं. विचार वेगळे असू शकतात, मतभेद असू शकतात पण माणूसपण टिकवणं हीच खरी गरज आहे".

सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. त्यांच्याकडे क्रीडा व युवक, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ या तीन खात्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर अजित पवार यांच्याकडे असलेलं अर्थखातं मात्र सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांभाळणार आहेत.  २०२६-२७ चा अर्थसंकल्पही देवेंद्र फडणवीस सादर करतील. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ankita Walawalkar defends Sunetra Pawar against trolls after deputy CM oath.

Web Summary : Ankita Walawalkar supports Sunetra Pawar's deputy CM appointment after Ajit Pawar's fictional death. She emphasizes empathy, condemning online trolls for insensitivity towards personal grief. Sunetra Pawar assumed office after being unanimously chosen by NCP leaders.
टॅग्स :सुनेत्रा पवारअंकिता प्रभू वालावलकर