Join us

मालदीवच्या समुद्र किनारी विकीसोबत रोमँटिक मूडमध्ये दिसली अंकिता, युजर्स म्हणाले - "प्रेग्नेंट आहे?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 19:33 IST

Ankita Lokhande And Vicky Jain : अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे त्यांच्या वादविवादांमुळे सतत चर्चेत येत असतात. ते भांडत असले तरी त्यांच्यात खूप प्रेम आहे, हे त्यांच्या व्हॅकेशन्सच्या फोटोत दिसून येते.

अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) हे त्यांच्या वादविवादांमुळे सतत चर्चेत येत असतात. ते भांडत असले तरी त्यांच्यात खूप प्रेम आहे, हे त्यांच्या व्हॅकेशन्सच्या फोटोत दिसून येते. या जोडप्याने त्यांच्या मित्रांसोबत व्हॅकेशन एन्जॉय केले. त्याचे फोटो आणि व्हिडीओ इंटरनेटवर शेअर केले गेले आहेत. चाहत्यांना त्यांच्या फोटोंना पसंती मिळताना दिसते आहे. दरम्यान हे फोटो पाहून चाहते अंकिता प्रेग्नेंट असल्याचा तर्क नेटकरी लावत आहेत.

अंकिता लोखंडे आणि विकी जैन सध्या 'लाफ्टर शेफ्स सीझन २'मध्ये दिसत आहेत. दोघेही पहिल्या सीझनमध्ये एकत्र दिसले होते आणि 'बिग बॉस १७' मधील त्यांच्या धमालमस्तीची खूप चर्चा झाली होती. पण मॉरिशसनंतर ते थेट मालदीवमध्ये पोहोचले आहेत, जिथून त्यांनी रोमँटिक फोटो आणि रील शेअर केले आहेत. अंकिता लोखंडे तिचा पती आणि उद्योगपती विकी जैनच्या मिठीत दिसत आहे.

यादरम्यान, लोकांच्या नजरा अभिनेत्रीच्या पोटावरही पडल्या आहेत. जे पाहून लोकांनी विचारले की, ती प्रेग्नेंट आहे का? अद्याप या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. कारण या जोडप्याकडून कोणतीही माहिती आलेली नाही. यापूर्वीही अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीबद्दल बरीच चर्चा झाली आहे. अनेक अफवा पसरवल्या गेल्या आहेत. शोमध्ये कृष्णा अभिषेकनेही अनेकदा विनोदी अंदाजात अभिनेत्रीला बेबी प्लानिंग करायला सांगितले.

युजर्सनी केला कमेंट्सचा वर्षावअंकिता लोखंडे ४० वर्षांची आहे आणि अशा परिस्थितीत तिच्या सासूबाईंनी अनेक वेळा नातवंडे असण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अंकिताच्या फोटोवरील कमेंट सेक्शनमध्ये काहींनी त्यांच्या जोडीला चांगले म्हटले तर काहींनी म्हटले, शून्य केमिस्ट्री. याशिवाय, चाहत्यांनी रेड हार्ट इमोजी आणि फायर इमोजीद्वारे त्यांचे कौतुक केले आहे.

टॅग्स :अंकिता लोखंडे