Join us

घर जावई बनून राहणार नाही विकी जैन, अंकिता लोखंडेने शेअर केले नव्या घराचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 14:09 IST

विकी आणि अंकिता लवकरच त्यांच्या नवीन घरी शिफ्ट होणार आहे. घराच्या बाल्कनीतून सगळी मुंबई दिसते.

टेलिव्हिजन अभिनेत्री अंकिता लोखंडेने 14 डिसेंबर 2021 रोजी बिझनेसमन विकी जैनसोबत लग्न केले. काही दिवसांपूर्वीच विकी जैनने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, तो अंकितासोबत दोन वर्षांपासून तिच्याच घरी राहत आहे आणि लवकरच ते दोघेही त्यांच्या नवीन घरात शिफ्ट होणार आहेत. दरम्यान, अंकिताने आपल्या नवीन घराचा एक फोटो शेअर केला आहे, लवकरच हे कपल या नवीन घरात शिफ्ट होणार आहे.

अंकिता लोखंडे अनेकदा तिचे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते. सध्या तिने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती विकी जैनसोबत तिच्या नवीन घराच्या बाल्कनीत उभी आहे. या बाल्कनीतूनही मुंबई शहराचे सुंदर दृश्य दिसते. फोटोत दोघेही एकमेकांचा हात धरून बाल्कनीत पोज देताना दिसत आहेत. अंकिता ऑरेंज कलरच्या ड्रेसमध्ये तर विकीने व्हाइट कलरचा टी-शर्ट आणि पॅन्ट घातली आहे.

अंकिताने या फोटोसोबत लवकरच असे कॅप्शनमध्ये लिहिलेले आहे. अंकिताच्या या पोस्टवर तिचे चाहते आणि मित्र तिला नवीन घरासाठी शुभेच्छा देत आहेत. कपलच्या पोस्टवर मोनालिसाने लिहिले की, वाह…ग्रँड पार्टीची वाट पाहत आहे. यासोबतच माही विजने लिहिले की, तुझी स्वप्ने. यासोबतच अनेक स्टार्सनी या फोटोवर कमेंट केल्या आहेत.

विकी आणि अंकिताने दोन वर्षांपूर्वी नवीन घर घेतले होते, पण कोरोना महामारीमुळे काम पूर्ण न झाल्यामुळे ते त्यांच्या घरी शिफ्ट होऊ शकले नाहीत. आता लवकरच दोघेही त्यांच्या नवीन घरात शिफ्ट होणार आहेत. 

टॅग्स :अंकिता लोखंडेटिव्ही कलाकार