Join us

अंकिता लोखंडेचं दिशा सालियनबद्दल मोठं वक्तव्य, म्हणाली, 'ती सुशांतची मॅनेजर नव्हतीच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 13:08 IST

सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवस आधीच दिशा सालियनचाही बाल्कनीतून पडून मृत्यू झाला होता.

२०२० साली बॉलिवूडमध्ये एका घटनेने खळबळ माजली. 'एम एस धोनी' फेम अभिनेता सुशांतसिंह राजपूतने (Sushant singh Rajput) आत्महत्या केल्याने संपूर्ण मनोरंजनसृष्टी हादरली. शिवाय चाहत्यांनाही जबर धक्का बसला. सुशांतच्या मृत्यूनंतर ड्रग्स प्रकरण, मर्डर अशा अनेक थिअरी समोर आल्या. शिवाय सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवस आधीच त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियनचाही बाल्कनीतून पडून मृत्यू झाला होता. या दोन्ही प्रकरणांचा आपापसात संबंध असल्याची शंका अनेकांना आली होती. नुकतंच सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) दिशा सालियनबद्दल (Disha Salian) मोठं वक्तव्य केलं.

अंकिता लोखंडे सध्या बिग बॉस 17 मध्ये सहभागी झाली आहे. आतापर्यंतच्या एपिसोड्समध्ये अनेकदा अंकिताने सुशांतबाबतीत खुलासे केले आहेत. आता नुकतंच तिने दिशा सालियनबद्दलही मोठं वक्तव्य केलं आहे. अंकिता म्हणाली,'तो काळ फार कठीण होता. ते घडलं तेव्हा मी सुशांतच्या आयुष्यात नव्हते.' यावर मुन्नावर फारुकीने अंकिताला विचारले की,'सुशांतच्या मॅनेजरचा मृत्यू त्याच्या मृत्यूआधी झाली की नंतर?' यावर अंकिता म्हणाली.'ती त्याची मॅनेजर नव्हतीच. तिने फक्त एकदा ५-६ दिवसांसाठी त्याच्यासाठी काम केलं होतं. पण ती त्याची मॅनेजर नव्हती.'

अनेकांना केलं ब्लॉक

मुन्नावरशी बातचीत करताना अंकिता पुढे म्हणाली,'मी त्या काळात सोशल मीडियावर अनेकांना ब्लॉक केलं. कारण माझ्याबद्दल इतकं वाईट बोललं जात होतं जे मी ऐकूच शकत नव्हते. मी त्यांना ब्लॉक केलं. मला अशा गोष्टी सांगितल्या गेल्या ज्या मी कधीच स्वीकारु शकत नाही.'

टॅग्स :अंकिता लोखंडेसुशांत सिंग रजपूतबिग बॉस