Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर अंकिताच्या सासूने केली खास मागणी; अभिनेत्रीसह घरातलेही झाले शॉक्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 18:54 IST

Ankita lokhande :व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अंकिताची सासू तिची ओटी भरत आहे. यात ती साडी आणि काही भेटवस्तू अंकिताला देते.

'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे(Ankita Lokhande). सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या अंकिताने अलिकडेच प्रियकर विकी जैनसोबत लग्नगाठ बांधली. विशेष म्हणजे लग्नानंतर अंकिता सातत्याने चर्चेत येत आहे. यात अनेकदा ती तिच्या सासरच्या मंडळींसोबत फोटो शेअर करत असते. अलिकडेच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या सासूने तिच्याकडे एक खास मागणी केल्याचं दिसून येत आहे. 

अंकिता आणि विकीच्या लग्नानंतर तिच्या कुटुंबीयांना या दोघांसाठी घरात एका पूजेचं आयोजन केलं होतं. या पूजेवेळी अंकिताच्या सासूने तिला आशीर्वाद देतांना तिच्याकडे एक गोड मागणी केली. ही मागणी ऐकल्यावर अंकिता थक्क झाली. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अंकिताची सासू तिची ओटी भरत आहे. यात ती साडी आणि काही भेटवस्तू अंकिताला देते. सोबतच अंकिता, दुधो नहाओ पूतो फलो...और जल्दी से जल्दी गुड न्यूज दो, असं तिची सासू म्हणते. सासूबाईंची ही मागणी पाहून अंकिताला आश्चर्यचकित होते आणि जोरजोरात हसू लागते.

दरम्यान, 'मम्मा आणि भाभी बिलासपूरची ही ट्रीम अविस्मरणीय करण्यासाठी तुमचे खूप खूप मनापासून आभार', असं कॅप्शन अंकिताने या व्हिडीओला दिला आहे. अंकिता आणि विकी जैनने १४ डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधली. तेव्हापासून अंकिता सातत्याने चर्चेत येत आहे.

टॅग्स :अंकिता लोखंडेसेलिब्रिटीबॉलिवूड