Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंकिता लोखंडेचं खरं नाव माहितीये का? सिनेसृष्टीत येण्यासाठी अभिनेत्रीने नावात केलेला बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 12:19 IST

'बिग बॉस'च्या घरात अंकिता ३९वा वाढदिवस साजरा करते आहे.

बिग बॉस १७'मध्ये अंकिता लोखंडेने पतीसह दणक्यात एन्ट्री घेतली होती. 'बिग बॉस'च्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी ती एक आहे. बिग बॉसच्या घरात अंकिता ३९वा वाढदिवस साजरा करते आहे. टीव्ही मालिकेपासून करिअरची सुरुवात केलेल्या या अभिनेत्रीला एकता कपूरच्या मालिकेत पहिला ब्रेक मिळाला होता. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतबरोबरच्या अफेअरमुळे ती चर्चेत होती.

पवित्र रिश्ता या गाजलेल्या मालिकेच्या माध्यमातून अंकिता लोखंडे हे नाव घराघरात पोहोचली. बिग बॉसच्या घरात गेल्यापासून अंकिता तिच्या वैयक्तिक जीवनाविषयी अनेक गोष्टींचा उलगडा करत आहे. अंकिताच्या प्रोफेशनल लाइफविषयी सगळ्यांनाच माहित आहे. मात्र, तिच्या खासगी आयुष्याविषयी फारसं कोणाला ठावूक नाही.

इंदौरमध्ये एका मराठी कुटुंबात अंकिताचा जन्म झाला आहे. अंकिताने २०२१ मध्ये विकी जैनसोबत लग्न केलं. आज ही अभिनेत्री अंकिता लोखंडे या नावाने लोकप्रिय आहे. मात्र, तिचं खरं नाव दुसरचं आहे. जे फारसं कोणाला ठावूक नाही. अंकिताने तिचं नाव बदललं आणि त्यानंतर इंडस्ट्रीत पदार्पण केलं.

पवित्र रिश्ता फेम अंकिता लोखंडेचे खरे नाव तनूजा होते. टीव्ही जगतात पदार्पण करण्यापूर्वी तिने आपले नाव बदलले होते. अंकिता हे तिचे टोपण नाव होते. अंकिताने ठरवलं की तिला तिच्या टोपण नावाने इंडस्ट्रीमध्ये ओळखले जाईल. जवळचे मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक तिला अंकिता नावाने हक्क मारायचे. त्यानंतर तिने तनूजाचे अंकिता केले.  

टॅग्स :अंकिता लोखंडे