Join us

"हा प्रश्न आता विचारु नका कारण...", प्रेग्नंसीविषयी विचारताच भडकली अंकिता लोखंडे, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 12:02 IST

गणेशोत्सवादरम्यान अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी माध्यमांशी संवाद साधला.

'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्री अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande)  २०२१ मध्ये बिझनेसमन विकी जैनसोबत (Vicky Jain) लग्नगाठ बांधली. त्यांचं अतिशय ग्रँड वेडिंग पार पडलं. विकी जैन अंकितासोबत बिग बॉस १७ मध्ये दिसला आणि तोही लाईमलाईटमध्ये आला. नंतर लाफ्टर शेफसारख्या रिएलिटी शोमध्येही तो झळकला. अंकिता आणि विकीला सतत गुडन्यूजवरुन प्रश्न विचारला जातो. लाफ्टर शेफ मध्ये अंकिताने स्वत:च आपण प्रेग्नंट असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र नंतर तिने मस्करी केल्याचं समोर आलं. आता नुकतंच एका मुलाखतीत तिला प्रेग्नंसीवरुन प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ती चांगलीच भडकली.

गणेशोत्सवादरम्यान अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी एका पत्रकाराने अंकिताला प्रेग्नंसीवरुन प्रश्न विचारला. तेव्हा ती म्हणाली, "मी खरं सांगते मला आता या प्रश्नाचा कंटाळा आला आहे. या गोष्टी आता मला विचारु नका. ज्या दिवशी गुडन्यूज असेल त्या दिवशी मी स्वत:च सांगेन. खरंच...मी आता या प्रश्नांना हवा देऊ इच्छित नाही. जरा जास्तच होतंय आणि मग आईबाबा होण्याचा दबाव वाटायला लागला आहे."

काही महिन्यांपूर्वी अंकिता आणि विकीने त्यांच्या व्लॉगमध्येही प्रेग्नंसीवर भाष्य केलं होतं. अंकिता म्हणालेली, "गेल्या काही दिवसांपासून या गोष्टी सुरू आहेत. आई कधी होणार, हा प्रश्न असला पाहिजे. संपूर्ण कुटुंब आमच्या मागे लागलं आहे. आमच्यात यावर चर्चाही होत आहेत. पण आता मी या प्रश्नाने थकले आहे. मला माफ करा. पण, जेव्हा मी गरोदर असेन तेव्हा नक्कीच तुम्हाला सांगेन". 

अंकिता आणि विकीच्या लग्नाला ४ वर्ष झाली आहेत. अनेकदा दोघांना गुडन्यूजवरुन प्रश्न विचारण्यात आले आहेत. मात्र आता अंकिताने सर्वांना सडेतोड उत्तर दिलं आहे. नुकतेच दोघंही 'लाफ्टर शेफ्स सीझन २'मध्ये दिसले. अंकिताच्या घरी गौरी गणपतीचं आगमन झालं होतं याचीही झलक तिने सोशल मीडियावरुन दाखवली होती.

टॅग्स :अंकिता लोखंडेप्रेग्नंसी