Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss 17 Finale: धक्कादायक! अंकिता लोखंडे फिनालेमधून बाहेर, सासू-जाऊबाईच्या डोळ्यात पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 00:03 IST

'बिग बॉस'ला मिळाले 'टॉप 3' सदस्य

Bigg Boss 17 Finale: 'बिग बॉस 17' फिनाले मध्ये टॉप 5 स्पर्धक फिनालेपर्यंत पोहोचले होते. त्यातील अरुण माशेट्टी हा पहिला स्पर्धक बाहेर पडला. तर आता आणखी एक सदस्य बाहेर पडला आहे. ती म्हणजे अंकिता लोखंडे (Ankita Lokhande). 'पवित्र रिश्ता' फेम अंकिता बाहेर पडल्याने सर्वांनाच धक्का बसला. तर तिकडे घरात मन्नारा, मुनव्वर आणि अभिषेकने डान्स करत जल्लोष केला. कमी वोट्स(Votes) मिळाल्याने अंकिताचा प्रवास इथेच संपला आहे.

 बिग बॉसला टॉप 3 सदस्य मिळाले आहेत.  सिझनच्या टॉप 5 स्पर्धकांमध्ये अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, अरुण माशेट्टी आणि मन्नारा चोप्रा यांनी मजल मारली होती. बिग बॉसने सुरुवातीला स्पर्धकांना लेटर बॉक्समध्ये पत्र ठेवण्यास सांगितले. यानंतर बिग बॉस ज्याचं नाव घेतील त्यांना लेटर उघ़डून सुरक्षित की एविक्टेड हे जो संदेश आहे ते वाचायला सांगतात. यामध्ये आधी मन्नारा, मुनव्वर आणि मुनव्वर सुरक्षित होतात. तर अंकिता एविक्ट होते. यामुळे सगळ्यांच्याच चेहऱ्यावर निराशा दिसते. अंकिताचा पती विकीही खूप निराश होतो. तर अंकिताची सासू रंजना जैन आणि तिची जाऊबाई देखील उदास होतात. सासूच्या डोळ्यात पाणी येतं. अंकिता टॉप 3 मध्ये नाही अशी कोणीच कल्पना केली नव्हती. अंकिताचे चाहतेही या निर्णयामुळे भावूक झाले आहेत. 

बिग बॉसच्या टॉप 4 मधून अंकिता लोखंडे बाहेर पडली आहे. आतापर्यंतची सर्वात स्ट्राँग स्पर्धक म्हणून तिच्याकडे पाहिलं जात होतं. मात्र फायनलच्या शर्यतीतून तिचा प्रवास संपला आहे. आता बिग बॉसला टॉप 3 स्पर्धक मिळाले आहेत. त्यामुळे फिनालेची उत्सुकता हळहळू आणखी वाढत चालली आहे. कोण जिंकणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. 

'या' गोष्टी अंकिताला पडल्या महागात

अंकिताला सुरुवातीला बिग बॉसमध्ये येताच सर्वांची लाडकी बनली होती. मात्र अचानक तिची आणि विकीची भांडणं प्रेक्षकांना कंटाळवाणी वाटू लागली. तसंच अंकिता सतत सुशांतसिंह राजपूतचं नाव घेऊन सहानुभूती मिळवते असंही बोललं गेलं. तसंच अंकिता आणि तिच्या सासूमधला वाद चव्हाट्यावर आला. या गोष्टींमुळे तिचा प्रतिस्पर्धक मुनव्वर फारुकी ्जास्त स्ट्राँग होत गेला. याच गोष्टींमुळे अंकिताला टॉप 3 पर्यंतही मजल मारता आली नाही.

टॅग्स :अंकिता लोखंडेसलमान खानबिग बॉस