Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंकिता लोखंडे आणि विकी जैन होणार वेगळे? अभिनेत्री म्हणाली - "तुझ्या आयुष्यातून मी जातेय..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 17:39 IST

Bigg Boss 17 : अंकिता लोखंडे आणि विकी जैनमध्ये पुन्हा एकदा वाद झाले आहेत. त्यांच्यातील भांडणं संपण्याचे काही नाव घेत नाही आहेत. आता तर तिने विकीला कायमचंच बोलायचं नसल्याचं सांगितलं आहे.

बिग बॉस १७(Bigg Boss 17)च्या घरात अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन(Vicky Jain)मधील भांडणं संपण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. नुकतेच फॅमिली वीक संपला, जिथे दोघांच्या आईंनी त्यांना समजावले. त्यानंतर दोघांनी ठरवले की, आता ते दोघे भांडणार नाहीत. मात्र आता पुन्हा एकदा त्यांच्यात वाद सुरू झाले आहेत. एवढेच नाही तर अंकिताने विकीला तुझ्या आयुष्यातून मी जात असल्याचे सांगितले.

अंकिता लोखंडे आणि विकी जैनचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात ते दोघे भांडताना दिसत आहेत. व्हिडीओत अंकिता बेडवर बसलेली दिसत आहे आणि विकी खाताना दिसतो आहे. व्हिडीओत पाहायला मिळत आहे की, विकी विचारतो, माझ्यात  काय कमी आहे? या नात्यात तुमच्या प्रेमाचा अभाव आहे. त्यात एक अडचण आहे. मग विकी म्हणतो- जेव्हा तू मुनव्वरचा हात धरून मिठी मारायचीस तेव्हा मलाही तसेच वागायला हवे होते. तुझी सर्व नाती शुद्ध आहेत आणि माझी सर्व नाती वाईट आहेत. तेव्हा अंकिता म्हणते की, मी असुरक्षित आहे. यावर विकी म्हणतो की, आता माझ्या मर्यादा संपल्या आहेत. मी सगळे करून थकलो आहे. तेव्हा अंकिता म्हणाली की, मी पण थकले आहे. मग विकी रागाने म्हणाला की, तू काही केले नाहीस. मी खरे सांगू लागलो तर ती ऐकू शकणार नाही.   

विकी म्हणतो, तू कॅप्टन नाहीस, मला का बोलतेस?

कलर्स वाहिनीने प्रोमो शेअर करत लिहिले की, विकी आणि अंकितामध्ये भांडण झाले आहे. त्यांचे नाते या परिक्षेत टिकून राहील का? दुसऱ्या प्रोमोमध्ये विकी बागेत बसून बोलत असल्याचे दाखवण्यात आले होते. तेवढ्यात अंकिता आली आणि विकीला म्हणाली की, विकी, अर्धी भांडी तुझी आहेत, प्लीज कर. यावर विकी म्हणतो, तू कॅप्टन नाहीस, मला का बोलतेस? यावर अंकिता म्हणते की ही कसली शिष्टाचार आहे बोलायची?

अंकिता म्हणाली की, तू फक्त भांडतोस...

यावर विकी चिडतो आणि म्हणतो की तू कॅप्टन नाहीस, मला आठवण करून देऊ नकोस. तू मर्यादा ओलांडली आहे. तू माझ्याशी नीट बोलली नाहीस तर माझ्याकडूनही काही अपेक्षा ठेवू नकोस. दोन लोकांसमोर मला कसे लाजवायचे ते तुला माहित आहे. यावर अंकिता म्हणाली की, मला माहित नाही तुला काय झाले आहे, तू फक्त भांडतोस. मला माफ कर मला तुझ्याशी कायम बोलायचे नाही. मी जातेय तुझ्या आयुष्यातून, आता तू बघ काय करायचं ते. 

टॅग्स :अंकिता लोखंडेबिग बॉस