अनिता राज परतणार एक था राजा एक थी राणी या मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2017 16:09 IST
अनिता राजने नव्वदीच्या दशकात अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. नौकर बिवी का, असली नकली, स्वर्ग जैसा घर असे ...
अनिता राज परतणार एक था राजा एक थी राणी या मालिकेत
अनिता राजने नव्वदीच्या दशकात अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. नौकर बिवी का, असली नकली, स्वर्ग जैसा घर असे तिचे अनेक चित्रपट गाजले आहेत. तिने माया या दूरदर्शनवरील मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर एंट्री केली होती. या मालिकेत तिने माया ही मुख्य भूमिका साकारली होती. पण या मालिकेनंतर तिने छोट्या पडद्यापासून दूर राहाणेच पसंत केले होते. ती अचानक अनेक वर्षांनंतर 24 या मालिकेत झळकली. 24 या मालिकेद्वारे अनिल कपूर छोट्या पडद्यावर पदार्पण करत असल्याने या मालिकेची खूप चर्चा झाली होती. या मालिकेत अनिताने साकारलेल्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या मालिकेनंतर ती तुम्हारी पखी, एक था राजा एक थी राणी या मालिकेत झळकली. पण गेल्या काही महिन्यांपासून एक था राजा एक थी राणी या मालिकेतून ती गायब आहे. पण लवकरच ती या मालिकेत परतणार असल्याचे कळतेय. अनिता या मालिकेत राजमाता ही भूमिका साकारते. आता ती या मालिकेत राजा म्हणजेच सरताज गिलला मदत करण्यासाठी येणार आहे. एक था राजा एक थी राणी या मालिकेतील अनिता राजने साकारलेली राजमाता ही भूमिका सगळ्यांनाच आवडली होती. या मालिकेने लीप घेतल्यानंतर राजमाता ही व्यक्तिरेखा मालिकेतून गायब झाली होती. पण आता प्रेक्षकांना तिला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. राजमाता या भूमिकेत अनिता परतणार असल्याचे तिने मान्य केले असले तरी या मालिकेच्या भूमिकेबाबत काहीही सांगण्यास तिने नकार दिला.