Join us

देशमुखांच्या पारंपरिक पुजेत अनिरुद्ध संजनालाही करणार सहभागी, यावर काय असेल अरुंधतीची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 13:25 IST

आई कुठे काय करते’ उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. 'आई कुठे काय करते’ मालिकेत होळीचा सण उत्साहात साजरा होणार आहे. यंदाच्या उत्सवावर कोरोनाचं सावट असल्यामुळे पुजाविधी कुटुंबाच्या उपस्थितीतच पार पडणार आहे. सण कोणताही असो देशमुखांच्या घरी त्याची तयारी खूप आधीपासून सुरु होते. अरुंधतीच्या तर उत्साहाला पारावर नसतो.

सध्या अनिरुद्ध-संजना प्रकरणामुळे घरात चिंतेचं वातावरण असलं तरी होळीचा सण मात्र एकत्रित येऊन साजरा करण्याचं सर्वांनी ठरवलं आहे. देशमुख कुटुंबात आनंदाचं वातावरण असताना संजनाची एण्ट्री झाली नाही तरच नवल. होळीच्या या पारंपरिक पुजेत संजनाला देखिल सहभागी करावं अशी अनिरुद्धची इच्छा असते. अनिरुद्धच्या अश्या वागण्याने अरुंधती दुखावली जाते. देशमुखांच्या होळीच्या या पुजाविधीमध्ये संजना सहभागी होणार का हे मालिकेच्या २८ मार्चच्या  महाएपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे.

  

टॅग्स :स्टार प्रवाह